घरमहाराष्ट्रशहराध्यक्ष पदावरून हटवल्यानंतर मनसेच्या वसंत मोरेंची फेसबुकवर भावुक पोस्ट

शहराध्यक्ष पदावरून हटवल्यानंतर मनसेच्या वसंत मोरेंची फेसबुकवर भावुक पोस्ट

Subscribe

गुरुवारी वसंत मोरे यांना पुण्याच्या शहराध्यक्षपदावरुन दूर करण्यात आलं. त्यानंतर वसंत मोरे यांनी आज फेसबुक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मनसेचे पुण्याचे माजी शहराध्यक्ष आणि नगरसेवक वसंत मोरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या भाषणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या मशिदीवरच्या भोंग्याच्या निर्णयाविरोधात वक्तव्य केलं होतं. त्यानंतर गुरुवारी वसंत मोरे यांना पुण्याच्या शहराध्यक्षपदावरुन काढण्यात आलं. त्यानंतर वसंत मोरे यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

या फेसबुकवरील त्यांच्या पोस्टमध्ये वसंत मोरे यांनी फिलिंग इमोशनल असं म्हणत “मी आजच साहेबांच्या हस्ते उदघाटन केलेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर उद्यानात असे रंग भरले होते आणि आजच…”या आशयाची त्यांनी पोस्ट केली आहे. वसंत मोरे यांच्या या पोस्टमुळे आता मनसेमध्ये अंतर्गत चर्चांना उधाण आलं आहे. वसंत मोरे यांना मनसे शहराध्यक्षपदावरून दूर केल्यानंतर साईनाथ बाबर त्यांच्या नावावर एकमत झाले आहे.

- Advertisement -

पुणे महानगरपालिकेत मनसेचे दोनच नगरसेवक आहेत. त्यामुळे वसंत मोरे यांना शहराध्यक्ष पदावरुन हटवल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला भविष्यात फायदा होणार की तोटा होणार या विषयी आता तर्क वितर्क लढविले जात आहेत. राज ठाकरे यांनी ज्यावेळेपासून मशिदीवरील भोंग्यावर वक्तव्य केलं आहे. त्यावेळेपासूनच वसंत मोरे यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यामुळे हे पुण्यातील मनसेचे वातावरण अधिकच चिघळले होते. त्यामुळे वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या भोंग्याविरुद्धचा आदेश नाकारल्यानंतर त्यांना पुणे शहराध्यक्षपदावरुन हटवले गेले. त्यांना त्या पदावरुन हटवले गेले असल्यामुळं भविष्यात याचा फटका वसंत मोरे यांना बसणार की मनसेला बसणार याचं उत्तर आता येणारा काळच देणार आहे.

- Advertisement -

शहराध्यक्ष पदावरुन मोरे यांना हटवल्यानंतर आता ही जबाबदारी साईनाथ बाबर यांच्याकडे देण्यात आली आहे. मोरे आणि बाबर ज्या कात्रज आणि कोंढव्यामध्ये नगरसेवक आहेत. या दोन्ही प्रभागामध्ये मुस्लिम समाजाची मतं जास्त आहेत. मोरे यांचा जो प्रभाग येतो त्यामध्येही मुस्लिम मतं जास्त असल्यामुळे मशिदीवरच्या राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त करुन त्याला विरोध केला होता.


हेही वाचा – Pakistan government in crisis : इम्रान खान सरकारचा पराभव निश्चित, ९ एप्रिलला कशी असणार रणनीती?

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -