घरमहाराष्ट्रपंतप्रधान दिल्लीला गेले, वाद संपला, भाषण नाकारल्याच्या प्रकरणावर अजित पवारांचे स्पष्टीकरण

पंतप्रधान दिल्लीला गेले, वाद संपला, भाषण नाकारल्याच्या प्रकरणावर अजित पवारांचे स्पष्टीकरण

Subscribe

अजित पवार यांना भाषण करण्यासाठी परवानगी न देणे हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान असून हा प्रकार गंभीर आणि वेदना देणारा आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अमरावती येथे पत्रकारांशी बोलताना दिली होती.

देहूतील संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पण कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पंतप्रधान कार्यालयाकडून भाषण नाकारल्याचा प्रकार घडला होता. यावरून बर्‍याच उलटसुलट चर्चा सुरू होत्या. त्यावर पहिल्यांदाच भाष्य करताना या प्रकरणावर मला काहीही बोलायचे नाही. पंतप्रधान आता दिल्लीत पोहचले आहेत. कार्यक्रम चांगला झाला होता, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी गुरुवारी दिली.

अजित पवार यांना भाषण करण्यासाठी परवानगी न देणे हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान असून हा प्रकार गंभीर आणि वेदना देणारा आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अमरावती येथे पत्रकारांशी बोलताना दिली होती. त्यानंतर हे प्रकरण बरेच रंगले होते.

- Advertisement -

त्यावर बारामतीमध्ये पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, देहूमधील कार्यक्रमाबद्दल मला काही बोलायचे नाही. हा कार्यक्रम होऊन बरेच दिवस झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता दिल्लीत पोहचले आहेत. देहूत अतिशय चांगला कार्यक्रम झाला. देहू वारकरी सांप्रदायातील अतिशय महत्त्वाचे ठिकाण आहे. मोठ्या संख्येने वारकरी आले होते. पहिल्यांदाच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला आले होते. त्यांनी सगळी पाहणी केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -