घरमहाराष्ट्रखलिस्तानी समर्थक दहशतवाद्याला नांदेडमधून अटक

खलिस्तानी समर्थक दहशतवाद्याला नांदेडमधून अटक

Subscribe

खलिस्तान समर्थक दहशतवाद्याला आज मंगळवारी नांदेड येथून अटक करण्यात आली आहे. बेल्जियशी संबंधित हा खलिस्तान समर्थक दहशतवादी संघटनेशी तो संपर्कात होता. सरबजीतसिंघ किरट असे या दहशतवाद्याचे ना आहे. नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेने आणि पंजाबच्या सीआयडी पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. रविवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सरबजीतसिंघ किरट हा खलिस्तान जिंदाबाद या प्रतिबंधीत दहशतवादी संघटनेचा सदस्या आहे. बेल्जियमशी संबंधित खलिस्तानी झिंदाबाद दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्यानेच त्याच्यावर ही कारवाई झाली आहे.

सरबजीतसिंघला बेल्जियममधून त्याला दहशतवादी कारवायांसाठी पैसे पुरवले जात होते. खलिस्तानचा विरोध करणारे हिंदू संघटनेचे नेते त्यांच्या रडारवर होते. सरबजितसिंह हा नांदेडमध्ये लपला असल्याची माहिती पंजाब पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पंजाब पोलिसांच्या सीआयडी पथकाने नांदेडमध्ये मुक्काम ठोकला होता. नांदेड गुन्हे शाखेसोबतच शिकारघाट परिसरातून सरबजीतसिंहला अटक करण्यात आली. पंजाबच्या अमृतसरमध्ये याबाबतचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात आधीच तिघांना अटक झाली होती. सरबजितसिंह यांच्या अटकेनंतर ही चौथा आरोपीही अटकेत आला आहे. सरबजीतसिंह हा पंजाबच्या फिरोजपूर येथील रहिवासी होता. जग्गा या टोपण नावाने त्याला ओळखले जायचे. खलिस्तानी दहशतवादी परमजीतसिंह पम्मा, मलतानी सिंह आणि इतराच्याही तो संपर्कात होता. पंजाब पोलिस लवकरच सरबजितसिंघचा ताबा घेणार आहेत.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -