घरमहाराष्ट्रसार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे भ्रष्टाचाराचा अड्डा; भाजप आमदाराचा आरोप

सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे भ्रष्टाचाराचा अड्डा; भाजप आमदाराचा आरोप

Subscribe

सार्वजनिक बांधकाम विभाग हा भ्रष्टाचारचा अड्डा बनल्याचा आरोप भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी सोमवारी विधानसभेत केला. आपल्या आरोपाच्या पुष्‍टयर्थ त्यांनी सभागृहात कागदपत्रे सादर केली. बांधकाम खात्‍याचा नांदेड विभाग तर भ्रष्‍टाचाराचे आगरच बनल्‍याचे सांगत बंब यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना लक्ष्य केले. आज विधानसभेत सन २०२२ -२३ या वर्षाच्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यावर चर्चा झाली. या चर्चेत सहभागी होताना प्रशांत बंब यांनी बांधकाम विभागाचा भ्रष्ट कारभारावर बोट ठेवले.

बांधकाम खात्‍याचे अतिरिक्‍त मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या विरोधातील एका प्रकरणात सीबीआय चौकशी करण्यात यावी असे मत केंद्रिय प्रशासनिक लवादाने दिले होते.मात्र सौनिक पाच वर्षे झाले तरी विभागातच आहेत. अधीक्षक अभियंता नाना पवार या अधिका-याची एसीबी चौकशी करण्याचे आदेश तर खुद्द मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीच दिले होते.मात्र चौकशी करण्यात येऊ नये अशा प्रकारे शेराच बदलवून घेण्यात आला, असा गंभीर आरोप बंब यांनी केला.

- Advertisement -

सार्वजनिक बांधकाम खात्‍यात अनेक नियमबाहय बदल्‍या झाल्‍याचा आरोप करताना प्रशांत बंब म्‍हणाले,नांदेड विभाग तर भ्रष्टाचाराचे आगरच बनला आहे.या विभागातील हायब्रीड ॲन्युटीच्या कामांची चौकशी झाली पाहिजे.या रस्‍त्‍यांची कोटयवधी रूपयांची कामे झाली आहेत.यातील एकही काम जर स्‍पेसिफिकेशनप्रमाणे झाले असेल तर मी राजकारण सोडेन, असे आव्हान बंब यांनी राज्य सरकारला दिले.या घोटाळयांतील रकमांची वसुली कंत्राटदारांकडून करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.


Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा आलेख घसरला; 99 नवे रुग्ण, 180 रुग्ण कोरोनामुक्त


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -