घरताज्या घडामोडीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिकेद्वारे माहिती पुस्तिकेचे प्रकाशन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिकेद्वारे माहिती पुस्तिकेचे प्रकाशन

Subscribe

महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी महानगरपालिकेद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येते.

महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी महानगरपालिकेद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येते. यंदाही ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून यंदासाठी तयार करण्यात आलेल्या या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा यांच्या हस्ते आज करण्यात आले. (Publication of information booklet by Municipal Corporation on the occasion of Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Day)

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६६ वा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रेरणादायी कार्याची, तसेच महापरिनिर्वाण दिन तयारीबाबतची माहिती देणारी पुस्तिका महापालिकेच्या जनसंपर्क विभागाने संकलित केली आहे. तर महापालिकेच्या भायखळा येथील महापालिका मुद्रणालयातून या पुस्तिकेचे मुद्रण करण्यात आले आहे.

- Advertisement -

या सचित्र माहिती पुस्तिकेचे प्रकाशन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा यांच्या हस्ते दादर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे उभारण्यात आलेल्या नियंत्रण कक्षात आज करण्यात आले. पुस्तक प्रकाशनानंतर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त शर्मा यांच्या हस्ते दिशादर्शक फुगा आकाशात सोडण्यात आला. महापालिकेद्वारे करण्यात येणाऱ्या अन्न वितरणाचीही सुरुवात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.

- Advertisement -

याप्रसंगी जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांच्यासह सर्वश्री महेंद्र साळवे, नागसेन कांबळे, रमेश जाधव, रवी गरुड, प्रतीक कांबळे, भिकाजी कांबळे, प्रकाश जाधव यांच्यासह अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दरवर्षी मुंबईतील चैत्यभूमी परिसरात येतात. त्यांना महापालिकेच्यावतीने निरनिराळ्या नागरी सेवा-सुविधा पुरवल्या जातात. त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाद्वारे डॉ. बाबासाहेब यांच्या जीवन कार्यावर आधारित चांगली माहिती संकलित असलेली पुस्तिकाही काढण्यात येते. या पुस्तिकेचे विनामूल्य वितरण अनुयायांना करण्यात येते. या माहिती पुस्तिकेची संगणकीय प्रत महानगरपालिकेच्या portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर असणाऱ्या ‘अंतरंग आणि अहवाल’ या सदराखाली ई-पुस्तके या विभागामध्ये उपलब्ध आहे.

दरम्यान, प्रत्यक्ष चैत्यभूमीवर येऊ न शकणाऱ्या अनुयायांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करता यावे, यासाठी चैत्यभूमीवरील शासकीय मानवंदना व पुष्पवृष्टीचे थेट प्रक्षेपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या समाजमाध्यम खात्यांवरुन करण्यात येणार आहे.


हेही वाचा – …तर महाविकास आघाडीसोबत जाऊ; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलं

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -