घरट्रेंडिंगकरोनाला घाबरून पुण्यात IT कंपन्यांचे 'वर्क फ्रॉम होम'!

करोनाला घाबरून पुण्यात IT कंपन्यांचे ‘वर्क फ्रॉम होम’!

Subscribe

पुण्यात करोनाचे दोन रूग्ण आढळले आहेत. रविवारी पुण्यात हे दोन रुग्ण सापडले असून त्यांना नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पुण्यात सापडलेले २ करोना रुग्ण फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ४० जणांच्या गटासोबत दुबईला गेले होते. हे रुग्ण १ मार्चला मुंबई विमानतळावर उतरले. त्यांच्यासोबत असलेले ४० जण राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातले होते. या दोघांनी मुंबई विमानतळावरून कॅब केली आणि ते पुण्याला आले. यामुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, पुण्यातील अनेक आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’च्या सूचना दिल्या आहेत.

करोनाचा धोका लक्षात घेऊन आयटी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याचा सल्ला दिला आहे. कर्मचाऱ्यांनी आवश्यकती काळजी घ्यावी आणि घरून काम करावे असे मेसेज आयटी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवले आहेत.

- Advertisement -

शासकीय यंत्रणाही सतर्क

‘गर्दीची ठिकाणं टाळा. आवश्यकता असेल, तरच प्रवास करा. आम्हाला कोणतीही जोखीम घ्यायची नाही. त्यामुळेच आम्ही ही सर्व काळजी घेत आहोत’, असं देखील आयुक्त यावेळी म्हणाले. ‘पुण्यातल्या डॉक्टरांना आम्ही विनंती केली आहे की पुण्यातल्या रुग्णांची तपासणी केल्यानंतर त्यांनी जर कुठे बाहेर प्रवास केला असेल, तर त्याची तपासणी करा. सर्दी, खोकला, साधा ताप अशी काही लक्षणं आढळल्यास त्यांची तपासणी करण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत. एकूण २७० बेड आम्ही रुग्णांच्या उपचारांसाठी तयार ठेवले आहेत’, अशीही माहिती आयुक्तांनी यावेळी दिली.


हे ही वाचा – पुण्यातले करोना रुग्ण ४० लोकांसोबत दुबईला गेले होते!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -