घरमहाराष्ट्रपुणे'ही' ओळखपत्रे असतील तरच मतदान करता येणार, वाचा सविस्तर

‘ही’ ओळखपत्रे असतील तरच मतदान करता येणार, वाचा सविस्तर

Subscribe

या निवडणुकीत बोगस मतदान होऊ नये, यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत.

कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. भाजप व महाआघाडीत थेट सामना असला असणार आहे. त्यामुळे या निवडणूकीकडे राज्यातील सर्वाचंचं लक्ष लागलं आहे.या निवडणुकीत बोगस मतदान होऊ नये, यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत.

कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी काही महत्त्वाच्या सुचना केल्या आहेत. मतदान करताना मतदारांची ओळख पटवण्याठी १२ ओळखपत्रे ग्राह्य धरले जाणार आहेत. यात मतदार ओळखपत्र, पारपत्र म्हणजे पासपोर्ट, आधारकार्ड, पॅनकार्ड यांसह १२ पुराव्यांचा समावेश आहे. जिल्हा प्रशासनातर्फे या पुराव्यांची यादी जारी करण्यात आली आहे. यातील कोणताही एक पुरावा असेल तर मतदाराला मतदान करता येणार आहेत.

- Advertisement -

यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य
मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, मनरेगा जॉबकार्ड, बॅंक किंवा पोस्ट ऑफिसचे छायाचित्र असेलले पासबुक, श्रम मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विना स्मार्टकार्ड, वाहन परवाना, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत भारताच्या महानिबंधकांद्वारे जारी केलेले स्मार्टकार्ड, पासपोर्ट, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज, राज्यशासन/केंद्रशासन, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना जारे केलेल्या छायाचित्रांसब सेवा ओळखपत्र, खासदार, आमदार यांनी दिलेले अधिकृच ओळखपत्र, केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने दिलेले दिव्यंगत्वाचे ओळखपत्र यांपैकी कोणताही एक पुरावा असेल तर तुम्ही या निवडणूकीत मतदान करू शकता.

मतदार याद्यांमधील मतदारांच्या अनुक्रमांकांमध्ये घोळ होऊ नये म्हणून मतदानाची तारीख आणि वेळ असलेली चिठ्ठी मतदाराला पुरवण्यात येणार आहे. तसेच सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहनही जिल्हाधिकारी देशमुख यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -