घरमहाराष्ट्रPune Plasma Bank: पुण्यात १४ वेळा प्लाझ्मा दान करणारी 'ही' व्यक्ती बनली...

Pune Plasma Bank: पुण्यात १४ वेळा प्लाझ्मा दान करणारी ‘ही’ व्यक्ती बनली चालती-फिरती ‘प्लाझ्मा बँक’

Subscribe

देशात सध्या कोरोनाची भयावह परिस्थिती असून या महामारीशी देश सामना करत आहे. अशा परिस्थितीत असेही काही लोक आहेत. जे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान, आपल्या जीवाची पर्वा न करता काही लोकं जे कोरोना रूग्णांचे प्लाझमा डोनेशन करून लोकांचे जीवन वाचविण्याचे कार्य करत आहेत. पुण्यात एका अवलियाने गेल्या नऊ महिन्यांत १४ वेळा लोकांना प्लाझ्मा दान केले आहे. यावेळी, कोरोनाच्या गंभीर रूग्णांसाठी प्लाझ्मा रामबाण इलाज ठरत आहे. बर्‍याचदा प्लाझ्मा दान केल्यामुळे आता या व्यक्तीला प्लाझ्मा बँकेच्या नावाने पुणेकरांनी संबोधण्यास सुरूवात केली आहे.

पुण्यातील या माणसाचे नाव अजय मुनोत असून त्यांचे वय ५० वर्ष आहे. त्यांनी आतापर्यंत १४ वेळा प्लाझ्मा देऊन लोकांचे प्राण वाचविण्यास मदत केली आहे. त्यांनी असे सांगितले की, जुलै २०२० मध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली होती आणि जूनमध्ये त्यांनी कोरोनावर मात केली, तेव्हापासून ते सतत प्लाझ्मा दान करत ​​आहे. आपल्या आईकडून या कामासाठी प्रेरणा मिळाली असेही अजय यांनी सांगितले.

- Advertisement -

मनोज यांच्या प्लाझ्मा दानाच्या कार्यामुळे बर्‍याच रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. प्लाझ्मा दान करुन लोकांना मदत करण्याची धडपड करणाऱ्या अजय यांनी अद्याप कोरोना लसदेखील घेतली नाही. त्यांचे म्हणणे आहे की, जर त्यांना कोरोना लस मिळाली तर त्यांना प्लाझ्मा दान करण्यास ते सक्षम राहणार नाही. यामुळे, त्यांना लस घेतली नाही जेणेकरुन ते लोकांना मदत करू शकतील. अजयन यांनी आतापर्यंत १४ वेळा प्लाझ्मा दान केल्याने एक विक्रम केला आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -