घरमहाराष्ट्रपुण्यातील नाईट कर्फ्यू १४ मार्चपर्यंत वाढला

पुण्यातील नाईट कर्फ्यू १४ मार्चपर्यंत वाढला

Subscribe

रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदी

राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. यातच पुण्यातही कोरोना संसर्ग वाढत असल्याने पुण्यात १४ मार्चपर्यंत निर्बंध वाढवण्यात आले आहेत. पुणे महानगरपालिकेच्या निर्णयानुसार पुण्यात आता १४ मार्चपर्यंत निर्बंध कायम राहणार असून रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदी कायम असणार आहे. मात्र अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या नागरिकांना मुभा असणार असून अत्यावश्यक सेवा सुरळीत राहणार आहेत. परंतु अनावश्यक फिरणाऱ्यांवर पुणे महानगरपालिकेकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. पुणे महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून पुण्यातील शाळा, महाविद्यालयं कोचिंग क्लासेस 14 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. महापौर मुरलीधर मोहोळ ट्वीटवरुन ही माहिती दिली आहे.

पुण्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता बंद ठेवलेली कोव्हिड केअर सेंटर पुन्हा सुरु करण्यात आली आहेत. तर गरज पडल्यास जम्बो हॉस्पिटलही पुन्हा सुरू करण्यात येईल. असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तर पुण्यातील लग्न सोहळे, समारंभांवरही पुणे महानगरपालिका करडी नजर ठेवून आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढू नये यासाठी पुण्यात विवाह सोहळा, खाजगी व सार्वजनिक कार्यक्रम, समारंभांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. या निर्बंधांमध्ये लग्न, समारंभास केवळ 200 जणांची उपस्थितीच असावी लागेल, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात असे स्पष्ट करण्यात आले आहे.


हेही वाचा- शिवसेनेचा अजून एक नेता अडचणीत, दोन दिवसात करणार पोलखोल- सोमय्यांचा इशारा

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -