घरमहाराष्ट्रपुणेपुणेकरांनो, बेधडक तोडा वाहतुकीचे नियम! चंद्रकांत पाटलांकडून 10 दिवसांची सवलत

पुणेकरांनो, बेधडक तोडा वाहतुकीचे नियम! चंद्रकांत पाटलांकडून 10 दिवसांची सवलत

Subscribe

पुणे : दिवाळी सणाचा उत्साह सर्वत्र ओसांडून वाहात आहे. त्यातच पुणे शहरात ठिकठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असल्याने नित्याच्या वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढील 10 ते 15 दिवस वाहतूक पोलिसांकडून कोणताही दंड आकारला जाणार नसल्याचे जाहीर करून पुणेकरांना वाहतुकीचे नियम मोडण्याची मोकळीक दिली आहे.

देशातील रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण आणि शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे तसेच उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन झाले. याची गंभीर दखल घेत केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आदेश जारी करत, आता वाहनातील सर्वांनाच सीटबेल्टची बंधनकारक केले आहे. त्याची अंमलबजावणी येत्या 1 नोव्हेंबर 2022पासून होणार आहे. एकीकडे नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत केंद्र सरकारने हा निर्णय घेतलेला असताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय, मुंबई आणि ठाण्यातही ठिकठिकाणी मेट्रो रेल्वेची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने नागरिकांना कायम वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे.

- Advertisement -

राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यावर सर्व सण बंधनमुक्त असतील, अशी घोषणा करण्यात आली. कोरोना महमारीच्या कारणात्सव आधीच्या महाविकास आघाडी सरकारने सण-उत्सवांवर बंधने घातली होती. आता ही बंधने नसल्याने दहीहंडी उत्सव, गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सव जोरात साजरे झाले. आता दिवाळी सण चार दिवसांवर आल्याने बाजारपेठा गर्दीने फुलल्या आहेत. पुण्यामध्ये मेट्रो रेल्वे तसेच इतर रस्त्यांच्या कामांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. त्यात वाहतुकीचे नियमही धाब्यावर बसवले जात आहेत. त्यामुळे देखील वाहनकोंडीत भर पडत असल्याने या वाहनचालकांकडून पोलीस दंडआकारणी करीत आहेत.

तथापि, या पुढील 10 ते 15 दिवस वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांकडून दंड आकारण्यात येणार नाही. केवळ समज देऊन त्यांना सोडण्यात येईल. पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडून वाहतूक नियमन करण्यात येईल. याशिवाय, खासगी रक्षकांची भरती करण्यात येणार असून महानगरपालिका, मेट्रो आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यात येणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सांगितले.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -