घरताज्या घडामोडीशिवभोजन थाळीसाठी तुफान गर्दी; रांगेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस तैनात

शिवभोजन थाळीसाठी तुफान गर्दी; रांगेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस तैनात

Subscribe

प्रजासत्ताक दिनाचे औचित्यसाधत ठाकरे सरकारने राज्यात शिवभोजन थाळी योजनेचा शुभारंभ केला. या शिवभोजन थाळी योजनेमार्फत सर्वसामान्यांना फक्त १० रुपयांत भोजन मिळत आहे. योजनेला सुरुवात झाल्यानंतर लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. पुण्यातील एका शिवभोजन थाळी केंद्रावर ५०० पेक्षा जास्त लोक रांगेत आल्यामुळे तीन पोलिसांना तिथे तैनात करण्यात आले. यासंदर्भात केंद्राचे मालक म्हणाले की, ‘थाळी घेण्याची गर्दी झाल्यामुळे रांगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना बोलवावे लागले. दुपारी १२ ते २ पर्यंतच्या वेळेत दररोज १० रुपयांची ही थाळी खरेदी करण्यासाठी किमान ५०० लोक केंद्रावर येतात.’

यादरम्यान रांगेत उभं राहून देखील थाळी मिळत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. थाळीची संख्या वाढवावी, अन्यथा योजना बंद करावी, अशाप्रकारे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पुण्यातील शिवभोजन थाळी योजनेचा प्रजासत्ताक दिनी पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभारंभ केला होता. या योजनेची वेळोवेळी माहिती घेऊन यात सुधारणा करू असं अजित पवार यांनी शुभांरभावेळी सांगितलं होत.

- Advertisement -

पीटीआयच्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून एपीएमसीच्या येथे असलेल्या केंद्रावर जवळपास ५०० लोक रांगेत उभे राहत आहेत. त्यामुळे अशांतता पसरते आहे.

१० रुपयात जेवण मिळत असल्याने नागरिकांची दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत आहे. बुधवारी पुण्यातील केंद्रामध्ये रांगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तीन पोलिसांना तैनात केले होते. या १० रुपयांच्या थाळीत दोन चपाती, भाजी, भात आणि यांचा समावेश आहे.

- Advertisement -

हेही वाचा – गोवंडीत पादचारी पुलाचा सांगाडा कोसळला; दोन गंभीर जखमी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -