घरमहाराष्ट्रपुण्यातही भुयारी मेट्रो?; महापालिकेच्या निर्णयावरच भिस्त

पुण्यातही भुयारी मेट्रो?; महापालिकेच्या निर्णयावरच भिस्त

Subscribe

स्वारगेट ते कात्रज दरम्यान उन्नत मेट्रो मार्ग बनवणे सध्याच्या परस्थितीत तांत्रिकदृष्ट्या कठीण असून त्याने त्याठिकाणी भुयारी मेट्रोचा पर्याय अधिक शक्य आहे. मात्र या बाबत अंतिम निर्णय महापालिकेचा असणार आहे.

स्वारगेट ते कात्रज दरम्यान उन्नत मेट्रो मार्ग बनवणे सध्याच्या परस्थितीत तांत्रिकदृष्ट्या कठीण असून त्याने त्याठिकाणी भुयारी मेट्रोचा पर्याय अधिक शक्य आहे. मात्र या बाबत अंतिम निर्णय महापालिकेचा असणार आहे, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले. दीक्षित म्हणाले की, ‘स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गाबाबत दोन ते तीन पर्याय होते. त्यातील भूयारी मार्गाचा पर्याय अंतिम झाला नसला तरी निश्चित करण्यात आला आहे. उन्नत मार्ग त्यासाठी येणारा खर्च कसा उभा करायचा या बाबतच्या पर्यायांचा अभ्यास करण्यात येत असून केंद्र सरकार राज्य सरकार महापालिका व कर्ज असे काही पर्याय आहेत.’ तर खर्चाबाबतचा निर्णय महापालिकेने घ्यायचा आहे.

या मार्गावर उन्नत मेट्रो मार्ग तयार करताना तो सरळ सातारा रोडने घेऊन जाणे शक्य नाही. त्यामध्ये शंकर महाराज उड्डाण पूल अडथळा ठरत आहे. यामुळे हा मार्ग फिरून न्याहावा लागत असल्याने याचे अंतर साडे अकरा किमी भरात आहे. तर भुयारी मार्ग हा सहा किलो मीटरचा असणार आहे. यापूर्वी भुयारी मार्गाचा खर्च ३ हजार ६०० कोटी व उन्नत मार्गाचा १ हजार ६०० कोटी होणार असल्याचे मेट्रो कडून सांगण्यात आले होते. मात्र आता उन्नत आणि भूयारी मेट्रोचा खर्च जवळ पास सारखाच होणार असल्याचे महामेट्रो कडून सांगण्यात आले आहे. यामध्ये केंद्र सरकार ५० टक्के, राज्य सरकार ३० टक्के व महापालिका २० टक्के, अशी विभागणी होती. मात्र राज्य सरकारने काहीही हिस्सा देणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे महापालिकेने खर्च बाबत निर्णय घेणे आवश्यक आहे, असे दीक्षित यांनी सांगितले.

- Advertisement -

शहरात सध्या वनाज ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. या मार्गाचे नामकरण मेट्रो कडून करण्यात येणार असून वनाज ते रामवाडी हा मेट्रो मार्ग नदीच्या परिसरातून जात असल्याने त्याला ‘एक्वा लाईन  किंवा ब्लू लाईन तर पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या दोन शहरांना जोडणाऱ्या मेट्रो मार्गाला ‘पर्पल लाईन’ म्हणून संबोधले जाणार आहे.

नाशिकप्रमाणे पिंपरी-चिंचवडमध्येही ‘मेट्रो नियो’चा प्लॅन ‘महामेट्रो’ने केला आहे. सध्या ही दोनच मार्गांवर असली तरी, सुमारे साडेसहा लाख प्रवासी याचा लाभ घेतील, असा दावा मेट्रोतर्फे करण्यात आला आहे. ही ‘मेट्रो नियो’ मॉडिफाईड असून, याला रेल्वेसारखे चाकही नाहीत आणि ती रुळावरही चालणार नसून, त्याला टायर आहेत. तसेच ती एलिव्हेटेड किंवा भुयारीही नसून, अन्य चार चाकी गाड्यांप्रमाणे किंवा ‘ट्राम’ प्रमाणे रस्त्यावरून धावणार आहे. तसेच २०४५ पर्यंतच्या लोकसंख्येचा विचार करून या ‘मेट्रो नियो’चा प्लॅन तयार करण्यात आला आहे. ही ‘मेट्रो नियो’ अशाप्रकारे बनवण्यात आली आहे, की जी नंतर एलिव्हेटेडही करता येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -