घरमहाराष्ट्रपुणेसध्याच्या राजकारणाला व्यावसायिक स्वरुप, खासदार गिरीश बापटांनी सर्व पक्षांना सुनावले

सध्याच्या राजकारणाला व्यावसायिक स्वरुप, खासदार गिरीश बापटांनी सर्व पक्षांना सुनावले

Subscribe

पुणे – राजकीय जीवनात आपण सामाजिक, शैक्षणिक काम करतो. पायभूत समाजाच्या शेवटपर्यंत जाणि आणि प्रश्न सोडवणे आपले काम आहे. पण, कार्यकर्त्यामधील कार्य मेले आन् फक्त पुढारीच राहिला हे बरोबर नाही. 40-45 वर्ष आम्ही सतत काम करत राहिलो. आपली बांधिलकी समाजाशी आहे. समाज नोंद घेत असतो. मतांच्या राजकारणासाठी काहीही करत राहिलो तर ते चुकीचे आहे, असे स्पष्ट मत पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी मांडले आहे. ते पुण्यात बोलत होते.

गिरीश बापट म्हणाले कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांच्या भूमिकेत राहावे. पक्ष त्यांची दखल घेत असतो. लोकप्रतिनिधी होण्याची सगळ्यांनाच संधी मिळते असे नाही. जागा मर्यादित आहेत. आरक्षण आहेत. खरा निर्मळ आनंद लोकांचे काम करण्यात असतो. एखाद्याचे काम आपण केले तर त्याच्या चेहऱ्यावर हास्य येते याचा आनंद वाटतो. पण, नव्या राजकीय संस्कृतीमध्ये काम सोडून बाकी सगळे सुरू आहे. हे आपच्या जुन्या पिढीतील लोकांना पटत नाही. मग तो कुठल्याही पक्षाचा, भाजपचाही असला तरी ते योग्य नाही, असे खासदार गिरीश बापट म्हणाले.

- Advertisement -

राजकारणाला व्यावसायिक स्वरुप –

आमचे भांडणं वैचारिक असले पाहिजे व्यक्तिगत नाही. एखाद्याचे विचार पटले नाही तर लोकशाहीपद्धतीने त्याला सांगितले पाहिजे. सध्याच्या राजकारणाला व्यावसायिक स्वरुप आले आहे. मी ३५ वर्ष नोकरी केली. नगरसेवक, आमदार असतानाही निवृत्त होईपर्यंत नोकरी केली. राजकारण हा माझा धंदा नाही. हे माझे व्रत आहे. आम्ही उद्दिष्टे ठेवून काम करतात. अडचणीत असलेल्या माणसांकडून काय अपेक्षा करणार. सगळं मतांच्या राजकारणासाठी केले जातय यात आनंद नाही असं बापटांनी म्हणाले.

- Advertisement -

राजकीय नेत्यांना सल्ला –

ज्यादिवशी मी मंत्री झालो तेव्हा एकदिवस माझ्या नावापुढे माजी मंत्री, माजी खासदार, माजी आमदार लागणार आहे. सध्या त्या परिस्थितीत कोण यायला तयार नाही असे कसे चालेल. हे चुकीचे आहे. सर्वपक्षांवर मी नाराज आहे. हे मनाला पटणारे नाही. सातत्याने काम करणे हा गुण आहे. राजकीय जीवनात चढ-उतार अनेक असतात. सहन करण्याची हिंमत ताकद हवी असा सल्ला गिरीश बापटांनी राजकीय नेत्यांना दिला.

राजकारणाची पातळी खालावली  –

शरद पवारांच्या आणि माझ्या पक्षाचे वैचारिक मतभेद नक्की आहेत. अनेक निवडणुकीत मी त्यांच्यावर टीका केली आहे. मात्र, मी वैयक्तिक पवारांवर किंवा अन्य कुणावरही टीका केली नाही. राजकारणाची पातळी एवढी खालावली की भविष्य काळात कोण राजकारणात येऊन काय करेल, सगळ्या समाजाचे नेतृत्व त्याच्याकडे असते. निर्णय प्रक्रियेत त्याचा सहभाग असतो. ते जर डोक्यात नसेल तर समाज कसा चालणार असा सवालही गिरीश बापटांनी उपस्थित केला.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -