घरक्राइमSharad Mohol Murder : तिघांनी झाडल्या गोळ्या, आरोपींसोबत दोन्ही वकील एकाच गाडीमध्ये...

Sharad Mohol Murder : तिघांनी झाडल्या गोळ्या, आरोपींसोबत दोन्ही वकील एकाच गाडीमध्ये – Pune Police

Subscribe

पुणे : शुक्रवारी (5 जानेवारी) पुण्याच्या कोथरूडममधील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पुणे पोलिसांनी रात्री उशीरा आठ जणांना अटक केली होती. यानंतर आता शरद मोहोळ खून प्रकरणात पुणे पोलिसांनी दोन वकिलांना अटक केल्यामुळे खळबळ उडाली आहे. यानंतर आता पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेत शरद मोहोळ हत्या प्रकरणी माहिती दिली आहे. (Sharad Mohol Murder Shots fired by three two lawyers with the accused in the same car Pune Police)

हेही वाचा – Sharad Mohol Murder Case : दोन वकिलांसह आठ आरोपींना अटक

- Advertisement -

पुणे पोलिसांनी सांगितले की, कोथरुडमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार शरद मोहोळ (वय 40, सुतरदरा, कोथरुड) याची हत्या करण्यात आली. दुपारी दीड वाजताच्या सुमारास शरद मोहोळ आपल्या घराकडे जात असताना त्याच्यासोबत असलेला साथीदार आरोपी मुन्ना उर्फ साहिल पोळेकर (रा. सुतारदरा) आणि इतर दोन आरोपींनी त्याच्यावर रस्त्यामध्ये गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर तिन्ही आरोपी पळून गेले. पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर चौकशी दरम्यान प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांकडून मुख्य आरोपी साहिल पोळेकरबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेने तपासासाठी पथकं तयार केली. साहिल पोळेकरच्या घराचा आणि मूळ गावाचा पत्ता घेऊन त्याचा शोध घेतला, पण तो काही सापडला नाही.

घटनास्थळावरून बातमीदाराने माहिती दिली की, शरद मोहोळ हत्येतील आरोपी दुचाकीवरून पळून गेले आहेत. त्या दुचाकीचा शोध घेतला असता ती बेवारस स्थितीमध्ये मिळाली. यानंतर तपास पुढे नेत असताना समजलं की, साहिल पोळेकर याच्याकडे चारचाकी गाडी आहे. त्या गाडीचा नंबर टोलनाक्यावर ट्रेस केल्यानंतर समजलं की, खेड-शिवापूर टोलनाक्यावरून सदर गाडी गेल्याचं निष्पन्न झाले. त्यानुसार आमची पथकं सातारा रोडला रवाना झाली. शिवरळच्या जवळ दोन चारचाकी गाड्यांमध्ये सर्व आठ आरोपी मिळून आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ईडीच्या कारवाईवर Rohit Pawar यांचे स्पष्टीकरण, म्हणाले – “माझा आक्षेप…”

शरद मोहोळ याच्यावर तीन आरोपींनी तीन बंदुकीतून गोळ्या झाडल्याचे प्राथमिक तपासामध्ये समोर आले आहे. याबाबत आणखी तपास सुरू आहे. या घटनेमध्ये मुख्य आरोपी साहिल पोळेकर हा मागील काही दिवसांपासून शरद मोहोळसोबत फिरायचा आणि त्याचा मामा नामदेव कानगुडे व दुसरा आरोपी पोळेकरचा नातेवाईक विठ्ठल कानडे या तिघाचं शरद मोहोळसोबत वैमनस्य होतं, असं प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे आणि तशाच प्रकारची माहिती दिली आहे. पण गुन्ह्याचा तपास सुरू असून या हत्येमध्ये आणखी कारण आहे का? हे शोधण्याचे आमचे प्रयत्न आहेत. आरोपींचा शोध घेत असताना दोन गाड्यांमध्ये 8 आरोपी सापडून आले. या आरोपींसोबत दोन वकील होते. आरोपींसोबत दोन्ही वकील का गेले? या हत्येमध्ये त्यांचा काही सहभाग आहे का? याबाबत तपासानंतर माहिती मिळेल, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -