घरमहाराष्ट्रपुणेकरांनी टाकलं मुंबईला मागे; विदेशी मद्य रिचवण्यात अव्वल

पुणेकरांनी टाकलं मुंबईला मागे; विदेशी मद्य रिचवण्यात अव्वल

Subscribe

‘पुणे तिथे काय उणे’ याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. पुणेकरांनी मुंबईकरांना विदेशी मद्य रिचवण्यात मागे टाकत अव्वल स्थानी पटकावलं आहे. कोरोनाचा काळ त्यात लॉकडाऊन असताना देखील पुणेकर मद्य रिचवण्यात अव्वल आहेत. फक्त विदेशी मद्यच नाही तर बिअर आणि वाईन पिण्यातही पुणेकारांनी मुंबईसह सर्वांना मागे टाकलं आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. या आकडेवारीतुन आलेल्या माहितीत औरंगाबादकरांनी देखील चकित केलं आहे. औरंगाबादकरांनी इतकी मद्य रिचवली की, मद्यातून मिळणाऱ्या महसुलात त्यांनी चक्क मुंबईला मागे टाकलं आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाची आकडेवारी समोर आली आहे. या वर्षांत नोव्हेंबरपर्यंत १८५.२४ लाख लिटर विदेशी मद्य रिचवली आहे. मुंबईसह उपनगरीत लोक १७०.०५ लाख लिटर विदेशी प्यायले. तर पुणे-मुंबई पाठोपाठ ठाणेकरांनी १४४.७१ लाख लिटर विदेशी मद्य प्यायले आहेत. सर्वात कमी विदेशी विदेशी मद्य सिंधुदुर्गकरांनी प्यायलं ते म्हणजे फक्त ३.०८ लाख लिटर.

- Advertisement -

कोरोनामुळे सगळीकडे लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यामुळ या उद्योगाला मोठं नुकसान झालं. दरम्यान, राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु होताच राज्याच्या अर्थकारणाला चालना मिळावी म्हणून मद्यविक्रीस परवानगी दिली. याचा फायदा राज्य सरकारला चांगलाच झाला आहे. राज्याला मद्य विक्रीतून तब्बल ७ हजार ७७६.६६ कोटी रुपये महसूल मिळाला आहे. यामध्ये औरंगाबादकरांचा राज्याच्या महसूलात हातभार लावण्यात सिंहाचा वाटा आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -