घरमहाराष्ट्रबी. जे. रुग्णालयाला नवसंजीवनी

बी. जे. रुग्णालयाला नवसंजीवनी

Subscribe

पालिकेकडून साहित्य खरेदी

शहरातील एकमेव बी. जे. अर्थात बैरामजी जीजीभाई रुग्णालयाला नवसंजीवनी देण्यासाठी नगर पालिकेने पुढाकार घेत दहा लाख रुपये किमतीचे अत्याधुनिक साहित्य खरेदी करून व्हेंटिलेटरवर असलेल्या या हॉस्पिटलला पुन्हा नवसंजीवनी दिली आहे. त्यामुळे यापुढे सर्वसामान्य रुग्णांना कमी पैशात तपासणी करून उपचार मिळणार आहेत.

रुग्णालयात दररोज 100 हून अधिक रुग्ण वेगवेगळ्या उपचारासाठी येत असतात. ब्रिटिश काळापासून असलेल्या हॉस्पिटलमध्ये अलीकडे सुविधांचा दुष्काळ होता. मधुमेह तपासणीसाठी रक्त चाचणी करणारी साधी यंत्रणाही नसल्यामुळे हे रुग्णालय फक्त प्राथमिक उपचार केंद्र बनले होते. तापाच्या रुग्णाला रक्त तपासणीसाठी शहराबाहेर इतर रुग्णालयात जावे लागत होते. यात रुग्णांचा वेळ आणि पैसा खर्च होत होता. नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, आरोग्य सभापती तथा उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी डॉक्टरांसोबत सल्लामसलत करून रुग्णालयातील सुविधांचा आढावा घेतला. कोकरे यांनी जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांच्याशी चर्चा केल्यानंतर निधी मिळविण्याचा मार्ग मोकळा झाला. यातून विविध ३५ उपकरणे रुग्णालयाला मिळाली आहेत.

- Advertisement -

माथेरानमधील हे रुग्णालय सर्वसामान्य, तसेच पर्यटकांसाठी खूप महत्त्वाचे आहे. येथे एमबीबीएस डॉक्टर असून, येथे उपकरणा अभावी प्राथमिक उपचार दिले जायचे. आता ही अडचण संपणार आहे. -प्रेरणा प्रसाद सावंत, नगराध्यक्षा

प्राथमिक रुग्णालय अशी झालेली या रुग्णालयाची ओळख पुसण्यासाठी कायापालट निर्णय डॉक्टरांच्या संमतीने घेतला आणि जिल्हाधिकार्‍यांनी मदतीचा हात दिल्यामुळे रुग्णालय आता परिपूर्ण असणार आहे. सर्व रुग्णांना आता इथेच उपचार मिळणार आहेत. – रामदास कोकरे, मुख्याधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -