Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी गौतमी पाटीलच्या डान्सवर आवर घाला अन्यथा गृहमंत्रालय कार्यालयाच्या काचा फोडू; मनसेचा इशारा

गौतमी पाटीलच्या डान्सवर आवर घाला अन्यथा गृहमंत्रालय कार्यालयाच्या काचा फोडू; मनसेचा इशारा

Subscribe

अभिनेत्री गौतमी पाटील हिच्या विकृत डान्सवर आवर घाला अन्यथा गृहमंत्रालय कार्यालयाच्या काचा फोडण्यात येतील, अशा शब्दांत मनसेने इशारा दिला आहे. तसेच, गौतमी पाटीलच्या लावणीवरून मनसेने जालन्यातील सेवली पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे.

अभिनेत्री गौतमी पाटील हिच्या विकृत डान्सवर आवर घाला अन्यथा गृहमंत्रालय कार्यालयाच्या काचा फोडण्यात येतील, अशा शब्दांत मनसेने इशारा दिला आहे. तसेच, गौतमी पाटीलच्या लावणीवरून मनसेने जालन्यातील सेवली पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. गौतमी पाटील हिच्या अश्लिल हावभावामुळे समाजातील वातावरण दूषित झाल्याचा आरोपही मनसेने केला आहे. गौतमी पाटीलच्या लावणीवरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. अनेकांनी तिच्याविरोधात तक्रार दाखल केली असून, त्यामध्ये आता मनसेने उडी मारली आहे. (Put a stop to Gautami Patil dance or we will break the glass of Home Ministry office MNS warning)

“अभिनेत्री गौतमी पाटील हिच्या विकृत डान्सवर आवर घाला, अन्यथा गृहमंत्रालयाच्या कार्यालयाच्या काचा फोडण्यात येतील”, असा इशारा देत जालन्यातल्या सेवली पोलिसात मनसेने तक्रार दाखल केली. मनसेच्या सिद्धेश्वर जनार्धन काकडे या तरुण मनसे कार्यकर्त्याने इशारा दिला आहे. तसेच, “हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे अनेक कलाकार संस्कृती जपून आपला डान्स सादर करत असतात. मात्र अभिनेत्री गौतमी पाटील ही हेतू पुरस्कर अश्लिल हावभाव दाखवत डान्स करत आहे. त्यामुळे समाजातील वातावरण दूषित होत चालले आहे”, असेही त्याने म्हटले.

- Advertisement -

मनसेने काय लिहिलंय पत्रात?

हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे अनेक कलाकार संस्कृती जपून आपला डान्स सादर करत असतात. मात्र अभिनेत्री गौतमी पाटील ही हेतू पुरस्पर अश्लिल हावभाव दाखवत डान्स करत आहे. याचे व्हिडिओ तयार करुन सोशल मीडियावर व्हायरल करुन व अश्लीलरित्या अंग प्रदर्शन करून हावभव करत आहे. यामुळे महाराष्ट्रात अश्लीलतेचं वातावरण निर्माण होत आहे. याचे वाईट परिणाम राज्यातील तरुणांवर होत आहे. म्हणून गौतमी पाटील हिच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी व महाराष्ट्रतृातील गुणी कलाकर यांच्या नावाला कलंक लावू नये, ही विनंती. असं या पत्रात लिहिण्यात आलं आहे.

- Advertisement -

सुरेखा पुणेकर यांनीही केली टीका

लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनीही गौतमी पाटीलवर टीका केली आहे. ज्या कलाकारांकडे लावणीचे गुण आहेत, तिला प्रोत्साहन द्या. अपुरे कपडे घालणे आणि अश्लील वर्तन करुन नाचणे याला लावणी म्हणत नाहीत अशी टीका सुरेखा पुणेकर यांनी केली आहे. अशा कलाकारांना समाजात अजिबात स्थान देऊ नका, अन्यथा महाराष्ट्राचादेखील बिहार होईल असंही सुरेखा पुणेकर यांनी म्हटले.


हेही वाचा – “माय मराठी”ला नख लावाल तर अंगावर जाऊ…; मराठी गाण्यावरून मनसे आक्रमक

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -