Tuesday, May 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Corona Update : महाराष्ट्र, मध्य प्रदेशसाठी रेल्वेकडून २२ अतिरिक्त कोविड कोच

Corona Update : महाराष्ट्र, मध्य प्रदेशसाठी रेल्वेकडून २२ अतिरिक्त कोविड कोच

महाराष्ट्रात नंदुरबार इथे ५८ रुग्ण सध्या या सुविधेचा लाभ घेत आहेत.

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रासह भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला आहे. आता हा ताण कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेने पुढाकार घेत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशसाठी २२ अतिरिक्त कोविड केअर कोच देण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड विरोधात देशाच्या एकत्रित लढ्याला अधिक बळ देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने आपल्या बहु आयामी उपक्रमांमधून ६४ हजार बेड्सची सोय असलेले ४ हजार विलगीकरण डबे तयार केले असल्याचे सांगण्यात आले.

राज्यांबरोबर समन्वित काम करण्यासाठी आणि शक्य तितक्या जलदगतीने पोहोचण्यासाठी रेल्वेने विकेंद्रित योजना आखली असून त्याद्वारे संलग्न कृतीसाठी विभागांना सामंजस्य करारावर काम करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. भारतीय रेल्वेच्या जाळ्यात मागणी असलेल्या ठिकाणी हे विलगीकरण डबे सहजपणे हलवता येणार आहेत.

- Advertisement -

राज्यांच्या मागणीनुसार आता २९९० बेड्सची सोय असलेले १९१ डबे विविध राज्यांना कोविड रुग्णांसाठी देण्यात आले आहेत. विलगीकरणाची सोय असलेले हे डबे सध्या दिल्ली, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश येथे उपयोगात आहेत. महाराष्ट्रात नंदुरबार येथे ५८ रुग्ण सध्या या सुविधेचा लाभ घेत आहेत. आतापर्यंत ८५ रुग्णांनी या सुविधेचा लाभ घेतला असून बऱ्या झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ३३० खाटा अद्याप उपलब्ध आहेत.

- Advertisement -