Monsoon Update: येत्या २४ तासात राज्यातील ‘या’ भागात मेघ गर्जनेसह पावसाचा इशारा

राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात

Rain Warning of thundershowers in some parts of state in next 24 hours
Monsoon Update: येत्या २४ तासात राज्यातील 'या' भागात मेघ गर्जनेसह पावसाचा इशारा

राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र परतीच्या पावसाने राज्यात चांगलाच धुमाकूळ घातल्याचे पहायला मिळत आहे. येत्या २४ तासात राज्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात येत्या २४ तासात मेघ गर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे तर शनिवारी विदर्भातील काही भागात देखील अशाच स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जळगावासह काही भागात १६ व १७ ऑक्टोबर रोजी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे.

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदूर्ग,रायगड तसेच कोल्हापूर, सातारा, पुणे, वाशिक जिल्ह्यात आज मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर शनिवारी १६ ऑक्टोबरला वर्धा, नागपूर,भंडारा, गोंदिया,चंद्रपूर,गडचिरोली या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे.

मुंबईसह पुण्यात काल संध्याकाळपासून ढगांच्या गडगडासह पावसाने हजेरी लावली होती. आजही पुण्यात पावसाने हजेरी लावली. गेल्या २४ तासात पुण्यात मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला आहे. तर मुंबई ठाण्यातही मध्यम स्वरुपाच्या पावसाची नोंद करण्यात आली. नवी मुंबईत तर आज सकाळी मुसळधार पाऊस झाला.

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यात होणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.


हेही वाचा – Navratri 2021: तुळजाभवानी मंदिरात VIP दर्शन बंद, संस्थानाकडून नवीन नियमावली जाहीर