घरमहाराष्ट्रडिजिटल प्लॅटफॉर्मवर पॉर्न फिल्म टाकत कुंद्राची लाखोंची कमाई

डिजिटल प्लॅटफॉर्मवर पॉर्न फिल्म टाकत कुंद्राची लाखोंची कमाई

Subscribe

अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणात अटकेत असलेला बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांची 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली असून त्याच्याबाबत आता अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्यातीलच एक म्हणजे त्यांच्या खात्यात रोज होणारे लाखो रुपयांचे डिपॉझिट! राजचे काही बँक डिटेल्स हाती लागले आहेत. त्यात हॉटशॉट डिजिटल प्लॅटफॉर्मवर पॉर्न फिल्म टाकत राज कुंद्रा लाखोंची कमाई करत होता, असे पोलीस तपासात आढळून आले आहे

तपासात राजच्या बँक डिटेल्सनुसार राज कुंद्रा आणि त्यांची कंपनी दिवसाला 1 ते 10 लाख रुपये कमवत होते. त्यांच्या बँक अकाऊंटवर रोज लाखो रुपये जमा होत असल्याचे बँक डिटेल्सवरून उजेडात आले आहे. ही रोजची आकडेवारी लाखो रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे या उद्योगातून राज कुंद्रा हे किती रुपयांची कमाई करत होते, याचा अंदाज बांधणेही कठीण आहे.

- Advertisement -

राज कुंद्रा यांचे बँक ट्रान्झॅक्शन डिटेल्स: 22 डिसेंबर 2020 – 3 लाख रुपये, 25 डिसेंबर 2020 – 1 लाख रुपये, 26 डिसेंबर 2020 – 10 लाख रुपये, 28 डिसेंबर 2020 – 50 हजार रुपये, 3 जानेवारी 2021 – 2 लाख 5 हजार रुपये, 10 जानेवारी 2021 – 3 लाख रुपये, 13 जानेवारी 2021 – 2 लाख रुपये, 20 जानेवारी 2021 – 1 लाख रुपये, 23 जानेवारी 2021 – 95 हजार रुपये, 3 फेब्रुवारी 2021 – 2 लाख 70 हजार रुपये. याचसारखे आणखी बँक ट्रान्झॅक्शन पोलिसांच्या हाती लागले आहेत.

पॉर्न फिल्म प्रकरणात एक नवीन बाब समोर आली असून हॉटशॉट अ‍ॅप निलंबित झाल्यानंतर राज कुंद्राने प्लॅन बी बनवला होता. प्रदीप बक्षी याच्याशी व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये गुगल प्लेने आपल्या स्टोअरमधून राज कुंद्राचे हॉटशॉट अ‍ॅप काढून टाकल्यानंतर देखील राज नवीन योजना आखत असल्याचे समोर आले आहे. राजने सगळा बोल्ड कंटेंट काढून प्ले स्टोअरवर पुन्हा हॉटशॉट सुरू करण्याची तयारी केली होती. गुगल प्लेने संपर्क साधलेल्या मेलचा तपशीलही या चॅटमध्ये आहे.

- Advertisement -

तर राजला यांना 3 वर्षाचा तुरुंगवास!
राज कुंद्रा यांच्या विरोधात मुंबई पोलिसांच्या हाती भक्कम पुरावे आहेत. त्यांच्याविरोधात अनेक आयपीसी कलमांसोबतच आयटी अ‍ॅक्ट कलम 67, 67A लावले गेले आहेत. त्यातील 67A हे पोर्नोग्राफी संदर्भात आहे. तो अजामीनपात्र गुन्हा आहे. त्यात पहिल्यांना गुन्हा केला असेल तर 3 वर्षाची शिक्षा आणि 5 लाख रुपये दंड आकारला जातो. एकाच व्यक्तीने दुसर्‍या वेळीही तोच गुन्हा केल्यानंतर तर त्याला 5 वर्षांची शिक्षा आणि 10 लाख रुपये दंड आहे. तर तिसर्‍यांदा गुन्हा केल्यास 7 वर्षांची शिक्षा आणि 10 लाख रुपये दंडाची कायद्यात तरतूद आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -