घरदेश-विदेशसीएए कायद्याला मुस्लीम व्यक्तीचा विरोध नाही

सीएए कायद्याला मुस्लीम व्यक्तीचा विरोध नाही

Subscribe

सर्व भारतीयांचा डीएनए एकच असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले होते. आता त्यांनी सीएए कायद्याला एकाही मुस्लीम व्यक्तीचा विरोध नसल्याचे विधान केले आहे. सीएए आणि एनआरसीमुळे हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पडण्याचा प्रश्नच येत नाही. केवळ राजकीय लाभासाठी याला जातीय रंग दिला जात आहे, असा दावा मोहन भागवत यांनी केला.

मोहन भागवत मंगळवारी संध्याकाळी आसामच्या दोन दिवसांच्या दौर्‍यावर आले आहेत. त्यांनी आसाममधील विविध भागांना भेटी देणार आहेत. त्यानंतर आसामसह अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि त्रिपुरा सारख्या पूर्वेकडील राज्यांमधील संघाच्या ज्येष्ठ पदाधिकार्‍यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. कोरोना महामारी, समाज आणि लोकांच्या विकासाच्या बाबींवर या बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर ते गुवाहाटी येथे बोलत होते.

- Advertisement -

चार हजार वर्षांपासूनचा आपला इतिहास आहे. आपल्याकडे असलेली विविधतेत एकता कुठेही पाहायला मिळत नाही. एवढे वैविध्य असूनही सर्वजण शांततेत राहत आहेत. एक समान होण्यासाठी सर्व गोष्टी समान असाव्यात असा विचार करणारे लोक आल्याने विभिन्नता निर्माण झाली. आमचा कोणत्याही विविधतेला आक्षेप नाही. आपल्या देशात किती वेगवेगळे राज्य होते. तरीही लोक काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत येत जात होते, असे भागवत यांनी सांगितले.

एकच ईश्वर हवा, एकच आचार पद्धती असावी, असे ज्यावेळी बोलले जाऊ लागले तेव्हा या समस्यांशी आमचा थेट सामना झाला. 1930 पासून योजनाबद्ध पद्धतीने मुसलमानांची लोकसंख्या वाढवण्याची मोहीम सुरू झाली. पाकिस्तानची निर्मिती झाली हे अंशिक सत्य आहे; पण आसाम मिळाला नाही. बंगाल मिळाला नाही. कॉरिडोर मिळाला नाही. मग जे मिळाले ते मिळाले असे ठरवले आणि बाकी काय मिळते, त्याकडे लक्ष दिले गेले. काही लोक त्रासून इथे येत होते. तर काही लोक केवळ लोकसंख्या वाढवण्यासाठी आले. त्यांना मदतही मिळाली. त्यातून ज्या भूभागावर आम्ही असू तिथे सर्व काही आमच्याच हिशोबाने चालेल, असे दाखवण्याचा हा प्रयत्न होता, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -