घरताज्या घडामोडीप्रभाग पद्धत : सत्ताधाऱ्यांकडून निवडणुकीची थट्टा, राज ठाकरेंचा संताप

प्रभाग पद्धत : सत्ताधाऱ्यांकडून निवडणुकीची थट्टा, राज ठाकरेंचा संताप

Subscribe

बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीवर मी याआधीच पाच वर्षांपूर्वी या विषयावर बोललो होतो. प्रभागांसाठी अशी कोणतीही नाही. एक प्रभाग आणि एक उमेदवार हीच पद्धत देशात आहे. महाराष्ट्रात कशी कुठे ही पद्धत सुरू झाली ? सत्ता काबीज करण्यासाठीच हे प्रकार सुरू झाले. ही पद्धत योग्य नसल्याचेही मत त्यांनी मांडले. आमदार, खासदारांचाही एक प्रभाग करायचा का ? असाही प्रश्न त्यांनी यावेळी केला. म्हणून जनतेलाच विनंती आहे की लोकांनी निवडणूक आयोगाकडे आणि कोर्टाकडे जावे. त्यामुळे पूर्ण निवडणूकीची थट्टा केली आहे, असेही मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडले. केवळ सत्ता काबीज करत विजय मिळवण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याची टीका त्यांनी केली. नाशिक दौऱ्यात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ठाकरे सरकारने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसाठी ठाकरे सरकारने प्रभाग समिती सदस्यांच्या फेररचनेचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर राज ठाकरेंनी कडाडून टीका केली आहे. (Raj Thacekray on ward wise revision of members cabinet decision by mahavikas aghadi for upcoming corporation election)

सत्ताधाऱ्यांनी संपुर्ण निवडणूकीची थट्टा केली आहे. जनतेला फक्त गृहित धरूनच सगळ्या गोष्टी सुरू आहेत. पण या सगळ्या प्रकारांविरोधात लोकांनी कोर्टात जायला हवे. अशा पद्धतीने प्रभागांची रचना करण्याचा सरकारचा नेमका काय उद्देश आहे ? गेल्या दहा वर्षात सत्ताधाऱ्यांकडून फक्त खेळ सुरू आहे. आपण फक्त हा खेळ बघत रहायचे असेही ते म्हणाले. ही प्रभागांसाठीची पद्धत योग्य आणि कायदेशीर नाही. निवडणूक आयोगानेच यावर कारवाई करायला हवी. हा कसला खेळ सुरू आहे असाही सवाल त्यांनी केला. ग्रामपंचायतीला अशी प्रभाग रचना चालत नाही, मग फक्त महापालिकेलाच का ? असाही सवाल त्यांनी केला.

- Advertisement -

याआधी २०१२ मध्ये राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस सरकारमध्ये होते. तोपर्यंत एक उमेदवाराचा प्रभाग होता. त्यानंतर दोघांचा एक प्रभाग झाला. भाजप सेनेने चारचा प्रभाग केला. त्यानंतर एकचा प्रभाग हा निवडणूक आयोगाने केला. पुन्हा तीनचा प्रभाग करण्यात आला. देशात अशी कोणतीही पद्धत नाही. फक्त महाराष्ट्रातच अशी पद्धत आहे. पण अशा प्रभागाने निवडणूक लढवता येत नाही. महाराष्ट्र केवळ एकमेव राज्य असेल जिथे अशी पद्धत आहे. हे सगळ महाराष्ट्रात केवळ सत्ता काबीज करण्यासाठी सुरू झाले. पैसा ओतायचा आणि निवडणूका जिंकायच्या हे केवळ सत्तेसाठी सुरू झाले. गेल्या दहा वर्षात खेळ सुरू आहे, आपण फक्त उघड्या डोळ्यांनी बघत रहायचे.


हेही वाचा – नाशिक मनसेत खांदेपालट, अंतर्गत नाराजीमुळे राज ठाकरेंचा मोठा निर्णय

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -