घरमहाराष्ट्रमविआतील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर, सत्तार-भुमरे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडतायत, टोपेंचा आरोप

मविआतील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर, सत्तार-भुमरे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडतायत, टोपेंचा आरोप

Subscribe

महाविकास आघाडीतील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार यांच्यामुळे राषअट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्रास होत आहे. हे दोन्ही नेते राष्ट्रवादीचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये फोडफोडी करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे.

औरंगाबाद येथे राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित कार्यक्रम मोळाव्यात बोलताना राजेश टोपे यांनी हा आरोप केला आहे. मार्चमध्ये शिवसेनेची संपर्क मोहीम मराठवाड्यात पार पडली. या मोहिमेमध्ये सर्वच जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीविरोधात नाराजीचा सूर लावला होता. पदाधिकाऱ्यांची कामं होत नाही, त्यांना मान-सन्मान मिळत नाही, अशा तक्रारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संपर्क मोहिमेच्या वेळी केल्या होत्या.

- Advertisement -

दरम्यान, आता राष्ट्रवादीकडून शिवसेनेवर आरोप होत आहे. राजेश टोपे यांनी स्वत: भुमरे आणि सत्तार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते फोडत असल्याचा आरोप केला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्रास होत आहे, याची मला जाणीव आहे. भुमरे आणि सत्तार हे दोघेही आपल्या सत्तेसाठी आमच्या कार्यकर्त्यांची फोडाफोडी करत आहे, त्यांना त्रास देत आहेत, असं राजेश टोपे म्हणालेत.

पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, मी माझ्या परीने त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अशा पद्धतीच्या फोडाफोडीच्या राजकारणाला स्थान असता कामा नये. आपण सर्वांनी एकत्रित काम केलं पाहिजे, तरच हे सरकार व्यवस्थित चालेल. आघाडीचा धर्म पाळावा, असं शिवसेनेच्या दोन्ही नेत्यांनी सांगणार असल्याचं राजेश टोपे म्हणाले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -