घरमहाराष्ट्रनाशिकसिडको-सातपूर सह शहरातील अनेक भागात बुधवारी पाणीपुरवठा बंद

सिडको-सातपूर सह शहरातील अनेक भागात बुधवारी पाणीपुरवठा बंद

Subscribe

गळतीच्या दुरुस्ती काम उद्या करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा होणार नाही

नाशिक : बुधवारी सातपूर, सिडको, नाशिक पश्चिममधील अनेक भागात पाणीपुरवठा होणार नसल्याचे महापालिकेच्या वतीने कळवण्यात आले आहे. शिवाय अनेक भागामध्ये कमी दाबाने पुरवठा केला जाणार आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांचे हाल होणार आहेत. सध्या शिवाजीनगर जलशुद्धीकेंद्रापासून सुरू होणारी आणि सातपूर, सिडको, नाशिक पश्चिम भागातीलपाण्याची टाकी भरणाऱ्या बाराशे मिमी व्यासाच्या सिमेंटच्या जलवाहिनीला गळती लागली आहे. या गळतीच्या दुरुस्ती काम उद्या करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा होणार नाही.

येथे होणार नाही पाणीपुरवठा

सातपूर : प्रभाग क्रमांक ७ मधील नहुष सोसायटी परिसर, पूर्णवादनगर,
आकाशवाणी टॉवर, तिरुपती हाउस परिसर, सहदेव नगर, पंपिंग स्टेशन, दादोजी कोंडदेवनगर, अरिहंत नर्सिंग होम
परिसर या भागात पाणी येणार नाही. सोबतच प्रभाग क्रमांक ८, ९, १०, ११, २६ आणि २७ मधील
चुंचाळे, दत्तनगर, माउली चौक या भागातही पाणी येणार नाही.

- Advertisement -

सिडको : प्रभाग क्रमांक २५ मधील इंद्रनगरी, कामटवाडा, धन्वंतरी, कॉलेज परिसर,
दत्तनगर, मटालेनगर, शिवशक्तीनगर, आयटीआय पूल परिसर, प्रभाग २७ चुंचाळे घरकुल योजना, दातीर मळा
अलीबाबानगर, खुटवडनगर, माउली लॉन्स, वावरेनगर, अंबड, महालक्ष्मीनगर या भागात पाणीपुरवठा होणार नाही.

पश्चिम विभाग : प्रभाग क्रमांक १२ येथील महात्मानगर जलकुंभ परिसर, पारिजातनगर, समर्थनगर, कामगारनगर,
सुयोजित गार्डन, वनविहार कॉलनी, उत्कर्ष कॉलनी, लव्हाटेनगर, पत्रकार कॉलनी, पीटीसी संभाजी चौक, उषाकिरण
सोसायटी, तिडके कॉलनी, कुटे मार्ग, चांडक सर्कल, तुपसाखरे लॉन्स, कालिकानगर, गडकरी चौक या भागातही
पाणीपुरवठा होणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -