घरमहाराष्ट्रराणा जगजितसिंह पाटील यांनी शिवसेना कार्यकर्त्यावर रोखली बंदूक

राणा जगजितसिंह पाटील यांनी शिवसेना कार्यकर्त्यावर रोखली बंदूक

Subscribe

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब पंचायत समितीच्या सभापतींच्या निवडीवरुन भाजप आमदार राणा जगतसिंह पाटील यांनी शिवसेना कार्यकर्त्याच्या डोक्यावर बंदूक रोखली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब पंचायत समितीच्या सभापतींच्या निवडीवरुन भाजप आमदार राणा जगतसिंह पाटील आणि शिवसेना खासदारांच्या गटांमध्ये जोरदार राडा झाला. दरम्यान, या वादानंतर आमदार राणा जगतसिंह पाटील यांनी एका शिवसेना कार्यकर्त्याच्या डोक्यावर बंदूक रोखल्याचे समोर आले आहे.

१९ जणांविरोधात गुन्हा

शिवसेनेकडून कळंब पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरु होत्या. तसेच आपले पळवलेले सदस्य परत आणण्यासाठी गेलेल्या राणा जगतसिंह पाटील आणि अकलूज मधल्या कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाली. या बाचाबाचीमध्ये १९ जणांच्या विरोधात अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर राणा जगजितसिंह पाटील यांच्या चार समर्थकांची दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

- Advertisement -

कळंब पंचायत समितीमध्ये एकूण १६ सदस्य आहेत. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे १० आणि सहा सदस्य शिवसेनेचे आहेत. यातील राणा जगजितसिंह पाटील यांच्या गटाचे कळंब इथले पंचायत समिती सदस्य शिवसेनेने पळवलेले. त्यामुळे हे पळवलेले सदस्य परत आणण्यासाठी गेलेल्या राणा जगजितसिंह पाटील आणि अकलूज मधील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी अकलूजमध्ये कार्यकर्त्यांच्या डोक्याला रिव्हॉलवर लावले. याप्रकरणी राणा जगजितसिंह पाटील यांच्यासह १९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.


हेही वाचा – एसटीला सलाम; १४ हजार किलोची रद्दी विकून कॅन्सरग्रस्तांना मदत


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -