घरमहाराष्ट्रRation shopkeepers Strike : नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच रेशन दुकानदार जाणार बेमुदत...

Ration shopkeepers Strike : नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच रेशन दुकानदार जाणार बेमुदत संपावर

Subscribe

नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच म्हणजेच उद्यापासून (ता. 1 जानेवारी 2024) राज्यातील रेशन दुकानदारांनी संप पुकारला आहे. उद्यापासून सुरू होणारा हा संप बेमुदत संप असणार असून विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशपातळीवरील ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डिलर्स फेडरेशनकडून हा संप पुकारण्यात आला आहे.

मुंबई : गेल्या महिन्याभरात राज्यात शासकीय कर्मचाऱ्यांनी संप पुकारून विविध गोष्टींची मागणी केली आहे. या संपानंतर आता नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच म्हणजेच उद्यापासून (ता. 1 जानेवारी 2024) राज्यातील रेशन दुकानदारांनी संप पुकारला आहे. उद्यापासून सुरू होणारा हा संप बेमुदत संप असणार असून विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशपातळीवरील ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डिलर्स फेडरेशनकडून हा संप पुकारण्यात आला आहे. अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघ देखील या संपात सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या आंदोलनात राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महासंघाकडून करण्यात आले आहे. (Ration shopkeepers will go on an indefinite strike from the first day of the new year)

हेही वाचा – Waluj MIDC Fire : छ. संभाजीनगरातील हँडग्लव्ह कंपनीला भीषण आग, 6 कामगारांचा होरपळून मृत्यू

- Advertisement -

पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूरसह राज्यातील विविध जिल्ह्यातील मिळून रेशन दुकानदारांची संख्या ही 53 हजार आहे. आजही या रास्त दुकानदारांच्या विविध मागण्या या प्रलंबित आहे. याच प्रलंबित न्याय हक्क मागण्यांच्या संदर्भात केंद्र आणि राज्य सरकार उदासीन असल्याचे महासंघाकडून सांगण्यात आले आहे. तर आजपर्यंत काढलेल्या मोर्चांची आणि आंदोलनांची देखील सरकारकडून दखल घेण्यात आलेली नाही. तर, महासंघाच्या निवेदनाची दखल घेत सरकारने सचिवांच्या अध्यक्षतेखाली हिवाळी अधिवेशन काळात नागपूरला पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात केवळ आश्वासने देण्यात आल्याचेही महासंघाकडून सांगण्यात आले आहे. तर सरकारकडून अद्यापही या मांगण्यांच्या संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

सरकारने रास्त भाव दुकानदारांच्याबाबतीत उदासीनता दाखवल्याने आता महासंघाच्यावतीने नाईलाजास्तव ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डीलर्स फेडरेशनने उद्या 01 जानेवारीपासून पुकारलेल्या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. या संपामध्ये आता अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघाने उडी घेतली आहे. ज्यामुळे राज्यातील जवळपास सर्वच रेशन दुकानदार हे संपावर जाणार आहे. रेशन दुकानदारांना मार्जिन इन्कम गॅरंटी 50 हजार करा, 2जी ऐवजी 4जी मशीन द्या, कालबाह्य नियम बदला आणि आनंदाचा शिधा कायमस्वरुपी राबवून कांदा, चणाडाळ, तूरडाळ, मूगडाळ या वस्तू रेशन दुकानात उपलब्ध करा या मागण्यांसाठी हा बेमुदत संप पुकारण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे शहर रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गणेश डांगी यांच्याकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -