घरमहाराष्ट्ररत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती गेल्या 10 दिवसांपासून बेपत्ता; पती पोलिसांच्या ताब्यात

रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती गेल्या 10 दिवसांपासून बेपत्ता; पती पोलिसांच्या ताब्यात

Subscribe

रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत गेल्या 10 दिवसांपासून बेपत्ता आहे. या प्रकरणी पोलिसांना उपतालुका प्रमुख असलेल्या त्यांच्या पतीवर संशय असून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. बेपत्ता झालेल्या स्वप्नाली सावंत यांचा मोबाईल पतीकडे सापडल्याने पोलिसांचा संशय बळावला आहे. दरम्यान पोलिसांकडून काल दिवसभर रत्नागिरी शहराच्या आसपासच्या परिसरात डॉग स्कॉडच्या मदतीने शोध घेण्यात आला. मात्र अद्यार त्यांचा कोणताच तपास लागला नाही. 1 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास स्वप्नाली सावंत कोणालाही न सांगता बेपत्ता झाल्या. दहा उलटून अद्याप त्यांचा ठावठिकाणा सापडत नसल्याने पोलिसांकडून आता पतीचा कसून चौकशी केली जात आहे. स्वप्नाली सावंत यांच्या अचानक बेपत्ता होण्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सुकांत सावंत यांचे पती शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सुकांत सावंत हे आहेत. मात्र त्यांच्या पत्नी स्वप्नाली सावंत अचानक बेपत्ता झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु असताना चौकशीसाठी त्यांच्या पतीला सुकांत सावंत यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ज्यामुळे आता त्यांच्या बेपत्ता होण्यामागे पतीचा तर हात नाही असा प्रश्नही उपस्थित होत आहे. मात्र पोलिस तपासात लवकरचं या प्रकरणाचा उलगड होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

दरम्यान पत्नी स्वप्नाली सावंत बेपत्ता झाल्याची तक्रार पती सुकांत सावंत यांनी रत्नागिरी शहर पोलस स्थानकात दिली आहे. या तक्रारीनंतर आता पोलिसांकडून त्यांच्या शोध सुरु आहे.


पनवेलमध्ये गणेश विसर्जनादरम्यान दुर्घटना, विसर्जन घाटावर 11 जणांना विजेचा शॉक

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -