गणेशोत्सवाचे दहा दिवस उत्साहात पार पडल्यानंतर अनंत चर्तुदर्शीच्या दिवशी शुक्रवारी दहा दिवसाच्या गणपतीचे विसर्जन झाले. मुंबईतील सुप्रसिद्ध लालबागचा राजाच्या विसर्जनासाठी देखील अनेक लाखो भक्तांची गर्दी जमली होती. शुक्रवारपासून लालबागच्या राजाला निरोप दिला जात आहे. मुंबई परिसरात रात्री उशीरापर्यंत मुरवणूक सुरू होती. पहाटे लालबाग राजा गिरगाव चौपाटीवर पोहोचला. त्यानंतर बाप्पाची शेवटची आरती पार पडली. कोळी समाजाकडून लालबागच्या राजा मानवंदना देणयात आली. सकाळी 9 :15 च्या सुमारास खोल सुमारास सुरक्षितरीत्या 22 तासांच्या मुरवणूकीनंतर अखेर लालबागच्या राजाचे विसर्जन पार पडले. गेले दहा दिवस लालाबागच्या राज्याची मनोभावे सेवा करणारे कार्यकर्ते भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले.
‘ही शान कोणाची लालबाग राजाची’ 22 तासांच्या मिरवणुकीनंतर अखेर राजाला निरोप
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -