घरमहाराष्ट्रराऊतांची रवानगी आता आर्थर रोड जेलमध्ये मलिकांच्या शेजारी, किरीट सोमय्यांचे सूचक ट्विट

राऊतांची रवानगी आता आर्थर रोड जेलमध्ये मलिकांच्या शेजारी, किरीट सोमय्यांचे सूचक ट्विट

Subscribe

ईडीने शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात अटक केली होती. यानंतर त्यांना आज कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांच्याबद्दल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एक ट्वीट केले आहे.

ट्वीटमध्ये काय? –

- Advertisement -

त्यांनी आता संजय राऊत यांची रवानगी नवाब मलिक यांच्या शेजारी आर्थर रोड जेलमध्ये होत आहे. अजुन तर पत्रा चाळ घोटाळ्याची चौकशी सुरु झाली आहे. वसई पर्ल ग्रुप घोटाळा, दुबई येथे पंचतारांकित हॉटेल्समध्ये बिल्डर्स सोबत मिटींग्स, चीन यात्रा सर्व घोटाळ्यांची चौकशी होईपर्यंत मुक्काम लांबणार वाटते, असे ट्वीट केले आहे.

- Advertisement -

संजय राऊत यांचा मुक्काम अर्थर रोड तुरुंगात –

न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे आजपासून संजय राऊतांचा मुक्काम अर्थर रोड तुरुंगात असणार आहे. न्यायालयीन सुनावणीवेळी संजय राऊत यांच्या वकिलांनाकडून यावेळी न्यायालयीन कोठडीतही संजय राऊत यांना ईडीच्या कोठडीप्रमाणेच घरचे जेवण, औषधे घेण्याची परवानगी आणि हवेशीर खोली दिली जावी अशी मागणी करण्यात आली. त्यावर कोर्टाने याबाबत आर्थर रोड तुरुंग प्रशासनाशी बोलून घेण्यास सांगितले आहे.

संजय राऊत यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी  –

पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. संजय राऊत यांची आज ईडीची कोठडी संपली असून, त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयातील सुनावणीदरमन्यान त्यांना 14 दिवसांची म्हणजेच 22 ऑगस्टपर्यत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -