घरताज्या घडामोडीमुख्यमंत्र्यांनीच शिवसैनिकांना हल्ला करण्यास सांगितले पण आम्ही जाणारच, रवी राणांचा आरोप

मुख्यमंत्र्यांनीच शिवसैनिकांना हल्ला करण्यास सांगितले पण आम्ही जाणारच, रवी राणांचा आरोप

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आमच्या घरावर हल्ला करण्यास सांगितले असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे. आम्हाला घरातून बाहेर पडण्यापासून रोखण्यात येत आहे. परंतु आम्ही घराबाहेर पडणारच यावर रवी राणा ठाम आहेत. शिवसैनिक खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात आक्रमक झाले असून रवी राणांच्या खारमधील घराबाहेर मोठ्या संख्येने शिवसैनिक जमले आहेत. मातोश्रीबाहेर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्धार राणा दाम्पत्याने केला आहे. रवी राणा यांना प्रत्यु्त्तर देण्यासाठी शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. राणा यांच्यात दम असेल तर त्यांनी मातोश्रीबाहेर यावे असे आव्हान शिवसैनिकांनी दिले आहे.

अमरावती बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण कऱण्याचा निर्धार केला आहे. राणा दाम्पत्याच्या घराबाहेर शिवसैनिक जमले असून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. ९ वाजता मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचा इशारा रवी राणा यांनी दिला होता. ९ वाजून गेल्यावर रवी राणा यांनी फेसबुक लाईव्ह येत शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. राणा दाम्पत्याने सुरुवातीला पूजा अर्चा केल्यावर मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात महाराष्ट्राला साडेसाती लागली आहे. साडेसाती संपवण्यासाठीच मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करणार आहे. परंतु आम्हाला जाण्यापासून पोलीस थांबवत आहेत. शिवसेनेचे कार्यकर्ते आमच्या घरावर हल्ला करत असून हा गुंडगिरीचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. या परंपरेला बट्टा लावण्याचे काम होत आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच शिवसैनिकांना माझ्या घरावर हल्ला करण्यासाठी सांगितले असल्याचा आरोप रवी राणा यांनी केला आहे.

मातोश्री आमचे श्रद्धास्थान

महाराष्ट्राला लागलेली साडेसाती दूर करण्यासाठी मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करणारच असे रवी राणा यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच मातोश्री आमचे श्रद्धास्थान आणि बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत आहेत. मी मराठी माणूस आहे तरिही मला मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्यापासून रोखण्यातय येत आहे. हा सत्तेचा दुरुपयोग करण्यात येत आहे असा आरोप रवी राणा यांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : मातोश्रीवर मोठा फौजफाटा तैनात, शिवसैनिकांकडून गाड्यांच्या डिक्कीची तपासणी

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -