घरताज्या घडामोडीरिफायनरी विरोधी संघटनेच्या मुंबई अध्यक्षांना अटक, सर्वेक्षणासाठी स्थानिकांचे आंदोलन

रिफायनरी विरोधी संघटनेच्या मुंबई अध्यक्षांना अटक, सर्वेक्षणासाठी स्थानिकांचे आंदोलन

Subscribe

कोकणातील बारसू येथील रिफायनरीला ग्रामस्थांनी विरोध केला आहे. याठिकाणी महिलांकडून मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं जात आहे. परंतु हे आंदोलन रोखण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केला जात असून सर्वेक्षणासाठी १८०० पोलिसांचा फाटा तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी आतापर्यंत काही जणांना अटकही करण्यात आली आहे. परंतु काल रिफायनरी विरोधी संघटनेचे मुंबई अध्यक्ष वैभव कोळवणकर यांना राजापूरमध्ये अटक करण्यात आली. त्यांच्यासोबत आणखी दोन सहकाऱ्यांनाही अटक केली असून तिघांनाही रत्नागिरीत ठेवण्यात आले आहे.

रिफायनरीच्या सर्वेक्षणविरोधातील आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. प्रशासनाने समज देऊनही नागरिक आंदोलनावर ठाम आहेत. याशिवाय उद्धव ठाकरे आज या मुद्दयावर पत्रकार परिषदही घेणार आहेत. त्यामुळे रिफायनरीचा मुद्दा तापण्याची चिन्हं दिसत आहेत.

- Advertisement -

रत्नागिरीसह राज्यातील इतर जिल्ह्यातून अधिकची पोलीस कुमक रत्नागिरीत मागवण्यात आली आहे. यामध्ये शेकडो अधिकारी आणि १८०० पोलीस कर्मचारी असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे. तसेच चोख बंदोबस्तात रिफायनरीचे ड्रोन सर्वेक्षण आणि माती परीक्षण करण्यात येणार आहे.

दीपक केसरकर काय म्हणाले?

- Advertisement -

रिफायनरीमुळे हजारो नोकऱ्या निर्माण होतील. परंतु आंदोलन करत असताना हे आंदोलन शांततापूर्ण मार्गाने झालं पाहिजे. गाडीच्या समोर झोपणं हा काही आंदोलनाचा प्रकार होऊ शकत नाही. त्याच्यामधून एखाद्याचा जीव जावू शकतो. शेवटी जीव फार बहुमोल असतो. त्यामुळे आता जे काही मी तुम्हाला सांगितलं. त्याबाबत अधिक माहिती गोळा करून कशी प्रदर्शित करता येईल, हा माझा प्रयत्न असेल. तसेच त्यासंदर्भात मी कारवाई देखील करणार असल्याचं दीपक केसरकर यांनी सांगितलं.

रिफायनरीसाठी माती सर्वेक्षण करण्यात येत असून काही स्थानिक ग्रामस्थांच्या विरोधामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रिफायनरीला विरोध करणाऱ्या विरोधकांना नोटीसा पाठवण्यात आल्या असून 45 रिफायनरी विरोधकांना 144 सीआरपीसी अन्वये प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आले आहेत. काहींना बारसू पंचक्रोशीत तर काहींना जिल्हाबंदीची नोटीस देण्यात आली आहे.


हेही वाचा : …तर आमचा रिफायनरीला विरोध, दीपक केसरकरांचं मोठं वक्तव्य


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -