घरराजकारणदादा भुसेंचा 1800 कोटींचा घोटाळा, राहुल कुल यांची सीबीआयकडे तक्रार; राऊतांचं टीकास्त्र

दादा भुसेंचा 1800 कोटींचा घोटाळा, राहुल कुल यांची सीबीआयकडे तक्रार; राऊतांचं टीकास्त्र

Subscribe

भाजप आमदार राहुल कुल यांच्या विरोधात  सीबीआय चौकशी व्हावी असं त्यांनी या ट्वीट मध्ये म्हटलं आहे  त्यामुळे आता राहुल कुल यांची सीबीआय चौकशी होणार का?

भीमा-पाटस साखर कारखाना घोटाळा प्रकरणात ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. राऊत यांनी ट्वीट करतदेखील ही माहिती दिली आहे. भाजप आमदार राहुल कुल यांच्या विरोधात  सीबीआय चौकशी व्हावी असं त्यांनी या ट्वीट मध्ये म्हटलं आहे  त्यामुळे आता राहुल कुल यांची सीबीआय चौकशी होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसचं दादा भुसेंनी गिरणा सहकारी साखर कारखान्यात 1800 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.   (Thackeray Group leader and MP Sanjay Raut Complaint against Rahul Kul  and Dadaji bhuse  to CBI  )

सहकारी साखर कारखान्याचे आजी माजी संचालक, ऑडिटर्स माझ्याकडे येत आहेत आणि शेकडो कोटींचा घोटाळा झाल्याचं बोलत आहेत. राहुल कुल यांनी शेकडो कोटींचा घोटाळा कारखान्यांमध्ये केला आहे. कुल यांच्या या घोटाळ्यांबाबत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. परंतु त्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे आता थेट सीबीआयकडे तक्रार केल्याचं राऊत म्हणाले. भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यात कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचं मी सीबीआयकडे सांगितल्याचे राऊत यावेळी म्हणाले.

- Advertisement -

( हेही वाचा: दहशतवादी सरकार बारसूमध्ये हत्याकांड घडवण्याच्या तयारीत; राऊतांचा घणाघात )

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांना अनेकदा पत्र लिहून भ्रष्टाचाराबाबत बोलायचं असल्याचं सांगितलं मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. आता त्यांना पुन्हा एकदा पत्र पाठवून भेटायचं असल्याचं सांगितलं. परंतु, ते गृहमंत्री झाल्यापासून भ्रष्टाचार करणाऱ्यांना संरक्षण मिळतंय जे त्यांच्या पक्षात आहेत, असा आरोप राऊतांनी केला आहे.

- Advertisement -

फडवीसांच्या अवती-भवती भ्रष्टाचारी लोकं

देवेंद्र फडणवीस यांच्या अवती भवती सर्व चोर, डाकू, भ्रष्टाचारी, लुटारु लोक आहेत. 500 कोटींचं मनी लाॅंड्रींग पुराव्यासह समोर दिल्यानंतरही अद्याप काही कारवाई नाही. मात्र, विरोधकांवर कारवाई केली जात आहे. दौंडचा भीमा पाटस साखर कारखाना, दादा भुसेंचा गिरणा सहकारी साखर कारखाना यात 1800 कोटींचा घोटाळा झाला आहे. याविरोधात हे राज्य सरकार काहीही कारवाई करत नाही म्हणून मी हे प्रकरण सीबीायकडे पाठवले आहे.

( हेही वाचा: मुख्यमंत्री दोन दिवसांसाठी ‘अनऑफिशियल’ सुटीवर; अचानक कुठे गेले एकनाथ शिंदे )

26 एप्रिलला संध्याकाळी पाच वाजता भीमा पाटस कारखान्याच्या परिसरात सभा घेणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले. फडणवीसांना आवाहन आहे की त्यांनी असं जनतेला लुटणाऱ्या, भ्रष्टाचारी लोकांना पाठिशी घालू नये. या राज्याचं अध: पतन होत आहे. हे राज्य भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडलं आहे. हे फार काळ चालणार नाही. गिरणा बचावच्या नावाखाली मंत्री दादा भुसे यांनी 1800 कोटी जमा केले. त्याचा कोणताही हिशोब नाही. हा सरळ सरळ भ्रष्टाचार आहे. लवकरच दादा भुसे आणि त्यांच्या अपहाराची तक्रार रितसरपणे ईडी आणि सीबीआयकडे करणार असल्याचं, राऊत म्हणाले. कारण गृहमंत्रालय त्यांच्या मंत्र्यांचे खटले घेत नाहीत, असं म्हणत राऊतांनी गृहमंत्री फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -