Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र रेखा झरे हत्याकांडातील आरोपी पत्रकार बाळ बोठे पुन्हा पोलिसांच्या ताब्यात

रेखा झरे हत्याकांडातील आरोपी पत्रकार बाळ बोठे पुन्हा पोलिसांच्या ताब्यात

Related Story

- Advertisement -

रेखा झरे हत्याकांडातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठेच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. रेखा झरे हत्याकांडाच्या गुन्ह्याखाली शिभा भोगून आल्यानंतर बोठेला महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले. यानंतर आत्ता बोठेविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. तोफखाना पोलिसांनी याप्रकरणी बोठेला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तसेच न्यायालयाने त्याला ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे सलग तिसऱ्या गुन्ह्यात पोलीस बाळ बोटेची चौकशी करत आहेत.

प्रथम रेखा झरे हत्याकांड प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून फरार झालेल्या बाळ बोठेला हैदराबाद मधून अटक करण्यात आली. याप्रकरणी त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. यानंतर त्याला विनयभंगाच्या दुसऱ्या एका गुन्ह्यात कोतवाली पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. या गुन्ह्यातही त्याला न्यायालयीन कोठडी सुनवण्यात आली. मात्र या न्यायालयीन कोठडीची मुदत संपत नाही तोवर बोठेविरोधात मंगल भुजबळ यांनी खंडणीचा तिसरा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी पारनेर न्यायालयात आणि जिल्हा न्यायालयात अर्ज करत चौकशीसाठी ताब्यात घेण्याची मागणी केली. यामुळे बोठे याला तोफखाना पोलिसांच्या हवाली करण्यात आली आहे.


- Advertisement -

 

- Advertisement -