घरमहाराष्ट्र'साठेबाजी करून रेमडिसीवीरवर स्वत: चे हसरे फोटो लावण्याचा भाजपचा डाव उघड'

‘साठेबाजी करून रेमडिसीवीरवर स्वत: चे हसरे फोटो लावण्याचा भाजपचा डाव उघड’

Subscribe

काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनवरुन राजकारण रंगाताना दिसत आहे. मुंबई पोलिसांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा सप्लाय करणाऱ्या ब्रुक फार्माचे संचालक राजेश डोकानिया यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. याची माहिती मिळताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर पोलीस स्टेशनला पोहचले. यावरुन आता काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. रेमडिसीवीरचा साठेबाजी करून त्यावर स्वत:चे हसरे फोटो लावण्याचा भाजपचा डाव उघड झाला आहे, असा हल्लाबोल काँग्रेसने केला आहे.

राज्यात सध्या रेमडेसिवीरची कमतरता असून त्याचा मोठा काळा बाजार होत असल्याच्या तक्रारी आहेत. अनेकांनी त्याचा साठा केल्याच्याही तक्रारी आहेत. निर्यातबंदी झाली असून काही जणांकडे मोठ्या प्रमाणात याचा साठा आहे आणि ते निर्यात करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. एफडीएच्या मदतीने आम्ही त्याची चाचपणी करत होतो. डोकानिया यांच्याकडे ६० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा साठा होता. त्यामुळे चौकशीसाठी आम्ही बोलावलं होतं आणि त्यानुसार आम्ही कारवाई करत आहोत असं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांच्या या कारवाईवर देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला. आपल्या महाराष्ट्राला रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स पुरवणाऱ्या कंपनीच्या मालकांना दमदाटी करून त्रास देणं योग्य नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. मात्र, एवढ्या रात्री एका कंपनीच्या संचालकाची बाजू घेण्यासाठी भाजपचे नेते पोलीस स्टेशनला पोहोचतात, यावरुन महाविकास आघाडी भाजपला लक्ष्य करत आहे.

- Advertisement -

“स्वत:च साठेबाजी करून मग त्या रेमडिसीवीर इंजेक्शनवर स्वत:चे हसरे फोटो लावण्याचा भाजपचा डाव उघड झाला. लोक मरत असताना त्यांच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या आणि स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेणाऱ्या औलादी महाराष्ट्रासाठी कलंक आहेत,” असं काँग्रेसने म्हटलं आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -