घरताज्या घडामोडी...आणि एकामागोमाग एक करत १५ नील गायी विहिरीत पडल्या

…आणि एकामागोमाग एक करत १५ नील गायी विहिरीत पडल्या

Subscribe

एकाच वेळी १५ नील गायी विहिरीत पडल्याची घटना घडली आहे.

एका मागोमाग एक करत एक दोन नाही तर तब्बल १५ नील गायी एका विहिरीत पडल्याची घटना यवतमाळमध्ये घडली आहे. या गायी आपल्या मार्गाने जात होत्या मात्र, अचानक या गायी तब्बल तीस फूट खोलीच्या विहिरीत पडल्या. या घटनेची माहिती तेथील स्थानिक गावकऱ्याला कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता, विहिरीत गायी पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ दखल घेत. या घटनेची माहिती वनविभागाला दिली. तात्काळ वनविभागाने घटनास्थळी धाव घेत तब्बल पाच तासांच्या प्रयत्नानंतर सर्व गायींना सुखरुप बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले आहे.

नेमके काय घडले?

नेर तालुक्यातील इंद्रठाणा शिवारात वनक्षेत्रालगत मोहन राठोड यांचे शेत आहे. त्यांच्या शेतालगतच त्यांनी तब्बल तीस फूट खोलीची विहिर बांधली आहे. मात्र, त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्यांनी त्या विहिरीला कठडा बांधलेला नाही. दरम्यान, नील गायींचा एक कळप रात्री अंधारात त्यादिशेने जात होता. मात्र, विहिरीला कठडा नसल्यामुळे एक गाय विहिरीत पडली. ती पडल्यानंतर तिच्या मागून चालणाऱ्या १५ गायी देखील विहिरी पडल्या. विहिरीत दहा ते बारा फूट पाणी होते. या पाण्यात गायी पडल्याने लागोपाठ आवाज आला. विहिरी कोणीतरी पडल्याने राठोड बाहेर धाऊन आले आणि त्यांनी पाहिले तर विहिरीत तब्बल एक दोन नाहीतर तब्बल १५ नील गायी पडल्या होत्या. त्यांना बाहेर काढणे देखील कठिण होते. अखेर गावकऱ्यांनी वनविभागाला तात्काळ बोलावून दोरखंडाची जाळी करत त्यांना जेसीबीच्या मदतीने बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले आणि सर्वांनीच सुटकेचा श्वास घेतला.

- Advertisement -

हेही वाचा – दुर्दैवी! गाडी झाडावर आदळल्याने भीषण अपघात; ३ जणांचा जागीच मृत्यू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -