Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र 'राष्ट्रपतींचा वारंवार अपमान', राऊतांचा मोदी सरकारवर घणाघात म्हणाले, अशाच व्यक्तींना...

‘राष्ट्रपतींचा वारंवार अपमान’, राऊतांचा मोदी सरकारवर घणाघात म्हणाले, अशाच व्यक्तींना…

Subscribe

संजय राऊत यांनी देखील पंतप्रधानांच्या हस्ते संसदेच्या उद्घाटनाला विरोध दर्शवला आहे, तसचं त्यांनी यावेळी मोदींवरही निशाण साधला आहे.

नव्या संसदेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 मे रोजी उद्घाटन केले जाणार आहे. या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय विरोधी पक्ष घेत असल्याच्या चर्चा आहेत. संसदेच्या उद्घाटनारुन आता राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या नाही तर राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन करावे, असं म्हटलं त्यानंतर अनेक विरोधी नेत्यांनी त्यांचं समर्थन केलं होतं आता या लिस्टमध्ये संजय राऊत यांचं नाव अॅड झालं आहे. संजय राऊत यांनी देखील पंतप्रधानांच्या हस्ते संसदेच्या उद्घाटनाला विरोध दर्शवला आहे, तसचं त्यांनी यावेळी मोदींवरही निशाण साधला आहे. ( Repeated insults to the President Sanjay Rauts attack on the Modi government  )

राऊत काय म्हणाले?

राऊतांनी गेल्या दोन कालखंडात राष्ट्रपतीपदावरील व्यक्तींचा वारंवार अपमान केला जात असल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रपतीपदावर अशचा व्यक्तींना बसवतात जे काही प्रश्न विचारणार नाहीत. आता संसद भवनाच्या उद्घाटन राष्ट्रपती यांच्या हस्ते न होणे, हा त्यांचा मोठा अवमान आहे. आता राष्ट्रपतींना निवडणुकीसाठी बाहेर काढले जाणार असल्याचे ते म्हणाले. यासंदर्भात राहुल गांधी यांनी मांडलेल्या भूमिकेलाही त्यांनी पाठिंबा दर्शवला.

…तेव्हा पंतप्रधान पदाचा चेहरा ठरणार

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 2024 मध्ये पराभव होणार आहे. यासाठी विरोधी एकत्र आले आहेत. मोदींचा पराभव झाल्यानंतर विरोधकांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. राज्य सरकार आणि केंद्र सरकार तपास संस्थांचा गैरवापर करत असल्याचा आरोप त्यांनी पुन्हा केला.

नव्या संसद भवनाची गरज नव्हती

नव संसद भवन त्रिकोणी आकाराचं बनलेलं आहे. संसदर भवन चार मजली इमारतीचं आहे. संसद भवनाचा संपूर्ण परिसर 64 हजार 500 वर्ग मीटरचा आहे. या संसद भवनाच्या निर्मितीसाठी 862 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. हा खर्च कोवीड काळात केला गेला. जून संसद भवन अजून 100 वर्षे चाललं असतं, याची काही गरज नव्हती. भाजपचे कोणीही भ्रष्टाचार, बेरोजगारी, दहशतवाद यावर बोलायला तयार नाही, असं राऊत यावेळी म्हणाले. तसंच, भाजप हा राजकारण आणि निवडणुकाग्रस्त पक्ष आहे, अशी टीकाही राऊत यांनी केली आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -