घरताज्या घडामोडीRepublic Day Parade : महाराष्ट्राच्या चित्ररथाला लोकप्रियतेत पहिलं बक्षिस, युपीचा चित्ररथ सर्वोत्कृष्ट

Republic Day Parade : महाराष्ट्राच्या चित्ररथाला लोकप्रियतेत पहिलं बक्षिस, युपीचा चित्ररथ सर्वोत्कृष्ट

Subscribe

महाराष्ट्रात आढळणारे दुर्मिळ प्राणी आणि फुले, पक्षांची प्रतिकृती चित्ररथावर होती. चित्ररथावर ८ फूटी फुलपाखराने सर्वांचे लक्ष वेधले होते.

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राजपथावर चित्ररथांचे प्रदर्शन करण्यात आले होते. प्रदर्शन सोहळ्यामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने बाजी मारत पॉप्युलर चॉईस कॅटेगिरीत पहिलं बक्षीस मिळवलं आहे. तर उत्तर प्रदेशच्या चित्ररथाने सर्वोत्कृष्ट बक्षीश मिळवले आहे. महाराष्ट्राचा चित्ररथ यावेळी जैवविविधता या संकल्पनेवर आधारित होता. या चित्ररथामध्ये महाराष्ट्रातील जैवविविधतेचं दर्शन घडवण्यात आले. महाराष्ट्रातील विविध प्राणी, रंगीबेरंगी फुले अशा सर्वच गोष्टींनी चित्ररथाला सजवले होते. महाराष्ट्राच्या चित्ररथाला नागरिकांनी अधिक पसंती दर्शवली आहे. ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या मतांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाला सर्वाधिक पसंतीची मते मिळाले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांच्या चित्ररथाला परवानगी देण्यात आली नव्हती. यंदा महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी देण्यात आली होती. महाराष्ट्राच्या संस्कृतिक विभागाने जैवविविधतेवर आधारित असा चित्ररथ साकारला होता. यावर महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवण्यात आले आहे. महाराष्ट्रात आढळणारे दुर्मिळ प्राणी आणि फुले, पक्षांची प्रतिकृती चित्ररथावर होती. चित्ररथावर ८ फूटी फुलपाखराने सर्वांचे लक्ष वेधले होते.

- Advertisement -

संरक्षण मंत्रालयाने पुरस्कारांची घोषणा केली आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाला पॉप्युलर चॉईस कॅटेगरीत पहिले बक्षीस भेटलं आहे. तर उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला सर्वश्रेष्ठ चित्ररथाचा पुरस्कार देण्यात आला आहे. तर सीआयएसएफची बेस्ट मार्चिंग पथक म्हणून निवड करण्यात आली आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) ला CAPF/इतर सहाय्यक दलांमध्ये सर्वोत्तम दल म्हणून नाव देण्यात आले.

- Advertisement -

चित्ररथावर महाराष्ट्राची जैवविविधता

चित्ररथावर ब्लू मॉर्मॉन हे फुलपाखरु आहे. ८ फुटाचे पुलपाखरु असणार असून त्याचे पंख उघडझाप करणार आहे. महाराष्ट्राचे ताम्हण फूल आहे. कास पठार दाखवण्यात आले आहे. त्यातील विविध फूल आणि सरडा सुपरबा ही जात दाखवण्यात आले आहे. राज्य प्राणी शेखरुची प्रतिमा देखील दाखवण्यात आली आहे. हा प्राणी महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे. राज्याचा पक्षी हरियाल त्याला पिवळं कबुतर म्हणतात ते दाखवण्यात आले आहे. वाघाला दाखवण्यात आले आहे. माळढोक पक्षी दाखवण्यात आला आहे. नव्याने सापडलेला खेकडा गुबर नटोरिया ठाकरियाना देखील दाखवण्यात आला आहे.


हेही वाचा : Unlock in Delhi : शाळा, जिम, जलतरण तलाव ७ फेब्रुवारीपासून सुरु, दिल्ली सरकारची नियमावली जारी

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -