करोना औषधांसाठी संशोधन सुरु

कोरोनाच्या संदर्भात कोरोना विषाणू लक्षणे दाखवण्यापूर्वीच इतरांना संसर्ग होतो, त्यामुळे त्यावर औषध तसेच वैद्यकीय उपाय शोधण्याचे सर्वात मोठे आव्हान आहे.

corona medicine

पुण्यातील पाच जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर बुधवारी मुंबईमध्ये दोन जणांना कोरोनाची लागण झाली. यावरुन आता कोरोनावर उपलब्ध असलेल्या औषध आणि लसींवर चर्चा सुरु झाली आहे. अद्याप औषधांची उपलब्धता नाही परंतू संशोधन सुरु आहे. संसर्गजन्य आजारांच्या औषधांमधील संशोधनाची गती वाढली असल्याचे वैद्यकीय तज्ञांनी सांगितले.


हेही वाचा – अमेरिका रिटर्न नागपुरचे जिल्हाधिकारी ‘कोरोना पॉझिटीव्ह’

भारतामध्ये अनेक संस्था या संसर्गजन्य आजारावर संशोधन सुरु असल्याचे आयसीएमआरच्या राष्ट्रीय सदस्य डॉ. नीलिमा क्षीरसागर यांनी सांगितले. कोरोनाच्या संदर्भात कोरोना विषाणू लक्षणे दाखवण्यापूर्वीच इतरांना संसर्ग होतो, त्यामुळे त्यावर औषध तसेच वैद्यकीय उपाय शोधण्याचे सर्वात मोठे आव्हान आहे. मात्र, त्यावर सातत्याने काम सुरू आहे. दरम्यान, संसर्गित देशातून प्रवास करुन भारतामध्ये आले असतील त्यांनी १४ दिवस स्वत:च्या घरात रहावे असेही आवाहनही त्यांनी केले आहे.