Eco friendly bappa Competition
घर क्राइम Akola Riots : अकोल्यात दंगलसदृश परिस्थिती, शहरात कलम 144 लागू

Akola Riots : अकोल्यात दंगलसदृश परिस्थिती, शहरात कलम 144 लागू

Subscribe

अकोला शहरात शनिवारी रात्री अचानक दोन गटात मोठा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या एका पोस्टमुळे ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

अकोला शहरात शनिवारी रात्री अचानक दोन गटात मोठा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या एका पोस्टमुळे ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच शहरातील अनेक दुचाकी, चारचाकी वाहनांना दंगलखोरांनी आग लावत जाळपोळ केली आहे. या घटनेनंतर अकोला शहरात कलम 144 लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. तर शहरातील परिस्थिती नियंत्रणात असून तणावपूर्ण वातावरण पसरले आहे. (Riot-like situation in Akola, Section 144 imposed in the city)

हेही वाचा – कर्नाटकात काँग्रेसला हात

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यातील एका व्यक्तीने सोशल मीडियावर पोस्ट टाकली. ज्यानंतर हरिहरपेठ भागातील राजराजेश्वर सेतू येथे शहरातून या वादाला सुरूवात झाली. या पोस्टनंतर दोन्हा गटांतील लोक समोरासमोर आले आणि त्यांनी एकमेकांवर दगडफेक करण्यास सुरूवात केली. या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा नोंदवून घेण्यात येत असतानाच शहरातील काही भागांत अचानकपणे दगडफेक करण्यास सुरूवात करण्यात आल्याची माहिती समोर आली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगवण्याचे काम सुरू केले. पण शहरात अशांतता पसरवणाऱ्या या दंगलखोरांनी वाहनांना लक्ष करत जाळपोळ करण्यास सुरूवात केली.

एका व्यक्तीने केलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे शहरात दंगल उसळल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 15 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. तर हे प्रकरण आणखी तापू नये, यासाठी जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी शहरात कलम 144 लागू करण्याचे आदेश दिले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra fadnavis) हे अकोल्याचे पालकमंत्री आहेत. सध्या शहरातील हरिहरपेठ आणि इतर काही भागांमध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याशिवाय राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या असून शहराला छावणीचे स्वरूप आले आहे. तर परिस्थिती नियंत्रणात असून तणावपूर्ण शांतता असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

कलम 144 लागू…
शहरातील झालेल्या या घटनेनंतर 144 कलम लागू करण्यात आले आहे. लोकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला असून घोळक्यांनी उभे राहण्यास मनाई करण्यात आलेली आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चौकाचौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संवेदनशील भागात अधिक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बाईकस्वारांची चौकशी केली जात असून पोलिसांकडून बाईकची देखील तपासणी केली जात आहे. तसेच दगडफेक करणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहेत. अमरावतीतून एसआरपीची तुकडी मागवली असून परिसरावर नजर ठेवली जात आहे.

- Advertisment -