घरताज्या घडामोडीरॉबर्ट वाड्रा मुंबईत सिद्धिविनायकाच्या चरणी; बाप्पाचे आशीर्वाद घेऊन लोकांसाठी केली प्रार्थना

रॉबर्ट वाड्रा मुंबईत सिद्धिविनायकाच्या चरणी; बाप्पाचे आशीर्वाद घेऊन लोकांसाठी केली प्रार्थना

Subscribe

सध्या भारत जोडो यात्रा सुरु आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी सुरक्षित रहावेत, देशातील लोकांचे दुःख दूर व्हावे. बेरोजगारी दूर व्हावी यासाठी बाप्पाकडे प्रार्थना केली असल्याचे प्रसिद्ध उद्योगपती आणि गांधी कुटूंबाचे जावई रॉबर्ट वाड्रा यांनी सांगितले.

रॉबर्ट वाड्रा आज प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिरात दर्शनाला आले होते. त्यावेळी ते बोलत होते. बेटी बचाव, बेटी पढाओचा नाराही लोक देतात, महिला सुरक्षेबद्दल बोलतात. मात्र, ते आत्मसात करत नाहीत. लहान मुलगी शेतकऱ्यासाठी बोलली तर तिला अटक केली, माझी मुलं देखील हे बघतायत, पुढची पिढी कशी समोर येणार, अशा शब्दांत वाड्रा यांनी यावेळी केंद्र सरकारवर टीका केली.

- Advertisement -

राहुल गांधी धर्मांध राजकारण करत नाहीत. त्यामुळे भाजपचे लोक त्यांना नेहमी चुकीच्याच नजरेने पाहतात. कोविडसंदर्भात त्सुनामी येणार असल्याचे राहुल गांधी बोलले होते, मात्र त्यांनी ऐकले नाही. शेतकरी आंदोलनादरम्यान प्रियांकालाही अटक केली होती. मात्र राहुल आणि प्रियांका हे दोघेही घाबरणारे नाहीत. ते लोकांमध्ये जातील आणि देशाला धर्मनिरपेक्ष ठेवण्याचा प्रयत्न करतील, असा विश्वास रॉबर्ट वाड्रा यांनी व्यक्त केला.

केंद्र सरकार नेहमीच राजकीय अस्थिरता आणण्याचा प्रयत्न करते. त्यामुळेच राज्यात प्रगती होत नाही. मी हिमाचल प्रदेशला जाणार असून राहुल गांधींसोबत १४ नोव्हेंबरनंतर महाराष्ट्रात येणार आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला फायदा होईल. लोकांना बदल हवा असून सध्या चुकीचे राजकारण सुरु आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या मेहनतीचे काँग्रेसला नक्की फळ मिळेल, असेही वाड्रा म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : उद्योग, कृषी क्षेत्रांचा ‘खोके’ सरकारवरील विश्वास उडालाय, आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -