घरताज्या घडामोडीमहिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची नियुक्ती, गुरुवारी स्वीकारणार जबाबदारी

महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची नियुक्ती, गुरुवारी स्वीकारणार जबाबदारी

Subscribe

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागील दीड वर्षांपासून राज्यातील महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त होते. अखेर रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली असून चाकणकर यांना अध्यक्षपदाच्या निवडीबाबतचे पत्र प्राप्त झाले आहे. गुरुवारी २१ ऑक्टोबर रोजी रुपाली चाकणकर राज्य महिला आयोग अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारतील. विजया रहाटकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त होते.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी अनेक नावे चर्चेत होती. मात्र महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून राष्ट्रवादी नेत्या रुपाली चाकणकर या महिलांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिकेत आहेत. यामुळे रुपाली चाकणकर याच अध्यक्षपदासाठी दावेदार मानल्या जात होत्या. अखेर रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

- Advertisement -

महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त असल्यामुळे राज्यातील वाढत्या महिला अत्याचारांच्या प्रकरणावरुन भाजपकडून महाविकास आघाडीवर जोरदार टीका करण्यात येत होती. महिलांची सुरक्षा, कायदा सुव्यवस्थेवर सरकार गंभीर नसल्याचा आरोपही करण्यात आली होती. विजया रहाटकर यांनी ४ फेब्रुवारी २०२० रोजी राजीनामा दिला होता. तेव्हापासून महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त होते. अखेर महाविकास आघाडीकडून या पदावर रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रावणाला मदत करणारी शुर्पणखा बसवू नका

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. यावेळी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला होता. महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणं आहे. अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी शुर्पणखा बसवू नका. अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल अशा आशयाचे ट्विट चित्रा वाघ यांनी केलं होते.

- Advertisement -

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांची भेट वैयक्तिक स्वरुपाची, सचिन सावंत यांची प्रतिक्रिया


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -