घरताज्या घडामोडीभाजपास पुन्हा सुतक, 'सामना'तून टीका

भाजपास पुन्हा सुतक, ‘सामना’तून टीका

Subscribe

वर्षभरापूर्वी १०५ आमदार येऊनही सत्ता गेली. तेव्हापासून महाराष्ट्रात भाजपला सुतक लागले होते. दरम्यान, कालच्या नागपूर-पुण्यातील पराभवाने भाजपला आणखी एक सुतक लागले आहे.

‘महाविकास आघाडीचे सरकार हे अनैसर्गिक आहे, त्यांना जनतेचा पाठिंबा नाही’, असे बोलणाऱ्यांनी विधान परिषदेच्या सहा जागांवर झालेल्या निवडणुकीच्या निकालाकडे जाड भिंगाचा चष्मा लावून पाहावे. वर्षभरापूर्वी १०५ आमदार येऊनही सत्ता गेली. तेव्हापासून महाराष्ट्रात भाजपला सुतक लागले होते. दरम्यान, कालच्या नागपूर-पुण्यातील पराभवाने भाजपला आणखी एक सुतक लागले आहे. एका वर्षात दोनदा सुतक लागणे हे भारतीय शास्त्रानुसार चांगले नाही. त्यामुळे भाजपला काहीतरी तोड करावीच लागेल.

काय आहे अग्रलेखात

- Advertisement -

चौथे चाक जनतेच्या विश्वासाचे

‘महाविकास आघाडीचे सरकार तीनचाकी आहे, अशी टीका भाजपकडून गेले वर्षभर होत आहे. यावर ‘‘सरकारला चाके चारच आहेत, चौथे चाक जनतेच्या विश्वासाचे आहे,’ असा टोला मुख्यमंत्री ठाकरे यांनी हाणला होता. तो विश्वास स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या शिक्षक, पदवीधर निवडणुकांनी खरा ठरवला. विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणुका झाल्या. त्यातील पाच जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. धुळे-नंदुरबार विधान परिषदेची जागा काँग्रेसमधून भाजपात शिरलेल्या अमरीश पटेल यांनी जिंकली. अमरीश पटेल यांची अशा प्रकारच्या निवडणुका जिंकण्याची कार्यपद्धती किंवा कौशल्य ज्यांना माहीत आहे ते या विजयाचे श्रेय भारतीय जनता पक्षाला देणार नाहीत. पदवीधर, शिक्षक मतदारसंघ म्हणजे भारतीय जनता पक्षाचीच मक्तेदारी होती. शिकले-सवरलेले, सुशिक्षित, सारासार विचार करणारे मतदार हे भाजपलाच मतदान करतात या भ्रमाचा भोपळा आता फुटला आहे.

भाजप मागे पडला

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचेच सतीश चव्हाण मोठ्या मताधिक्याने जिंकले. पुण्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातही भाजपचा पराभव झाला. पुणे पदवीधरसुद्धा भाजपचाच गड होता. अनेक वेळा तेथे प्रकाश जावडेकर विजयी होत. नंतर सध्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुणे पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्व करीत होते. पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्व करीत असतानाच ते महाराष्ट्राचे महसूलमंत्री, प्रदेशाध्यक्ष झाले. विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी कोल्हापुरातून पुण्यात आले आणि आता त्यांच्याच नेतृत्वाखाली पुण्याचा पदवीधर मतदारसंघ भाजपने गमावला. पुण्याच्या शिक्षक मतदारसंघातही भाजप पराभूत झाला.

- Advertisement -

हेही वाचा – ‘महाविकास आघाडीची ‘महाराष्ट्र एक्सप्रेस’ आता अधिक गतिमान होणार!’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -