घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री उद्धव ठाकरे वाझेंचे वकील

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वाझेंचे वकील

Subscribe

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टीका

मनसुख हिरेन मृत्य प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव समोर आल्याने विरोधकांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सचिन वाझे यांना दुसर्‍या वकिलाची गरज नाही. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांचे वकील आहेत, असा घणाघात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. सचिन वाझे यांना हे सरकार पाठीशी घालत आहे, असा आरोप भाजप करत आहे. वाझे यांच्या विरोधात सर्व पुरावे असताना त्यांच्यावर कारवाई का करत नाही? असा सवाल फडणवीस यांनी केला.

सचिन वाझे यांना वकिलाची गरज नाही आहे. कारण स्वतः मुख्यमंत्री वाझेंकडून जोरदार बॅटिंग करत आहेत. ते त्यांचे वकील आहेत, असा आरोप फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी देखील मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरून दोन्ही सभागृहात गदारोळ पाहायला मिळाला. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात नाव आलेले सचिन वाझे यांचे नाव आल्यानंतर भाजप सातत्याने त्यांच्यावर निलंबन करून कारवाई करावी, अशी मागणी करत होते.

- Advertisement -

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात लबाड सरकार म्हणून ठाकरे सरकारचे नाव लिहिले जाईल. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शेतकर्‍यांचे मीटर न कापण्याचे आदेश द्यायचे आणि शेवटच्या दिवशी निर्णय बदलायचे. ग्रामीण शहरी भागातील नागरिकांना सरकारने विजेचा झटका दिला आहे, त्यामुळे आम्ही त्यांना लबाड सरकार म्हणत आहोत, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. शेतकर्‍याला कर्जमाफी नाही, कुक्कुटपालन करणार्‍या शेतकर्‍यांना कर्जमाफी नाही. महाराष्ट्राच्या शेतकर्‍यांची फसवणूक सरकारने केलेली आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.

पीक विमा कंपन्यांना फायदा झाला. शेतकर्‍यांना फायदा झालेला नाही. विमा कंपनीवर जाऊन शिवसेना आंदोलन करत होती आता शिवसेना शांत का? हे सरकार लबाड सरकार आहे. सरकारमध्ये कुठेही ताळमेळ नव्हता. ओबीसीच्या जागा कमी केल्या. मराठा आरक्षणात सरकार कमी पडत आहे. हा सरकारचा खरा चेहरा बाहेर आला आहे. हे सरकार मारून मुटकून एकत्र आलेले आहे. काँग्रेसचे एकही मंत्री पत्रकार परिषदेत नाही. माननीय मुख्यमंत्री या सभागृहाला गंभीरपणे घेत नाहीत ते सभागृहात येत नाही. सभागृहात ताणतणाव आल्यानंतर मुख्यमंत्री आणि इतर लोक बसून उपाय काढत असतात; पण मुख्यमंत्री नवीन पध्दत आणत आहेत, असे फडणवीस म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -