Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले, सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये स्लॅब कोसळला

आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले, सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये स्लॅब कोसळला

Related Story

- Advertisement -

मुंबईतल्या मलबार हिल परिसरात सह्याद्री अतिथीगृह येथे घडलेल्या एका स्लॅब कोसळण्याच्या दुर्घटनेतून राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे थोडक्यात बचावले. सह्याद्री अतिथी गृहातील फाऊंटनच्या वरील मोठा स्लॅब कोसळण्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. सह्याद्री अतिथीगृहात असलेल्या हॉल क्रमांक ४ येथे हा स्लॅब कोसळला. पण या घटनेनंतर मंत्र्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सगळ्या यंत्रणेची तारांबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. पीओपीचे बांधकाम असलेला स्लॅब हा झुंबरासह खाली कोसळल्याने मंत्र्यांचीही एकच पळापळ झाली. महत्वाचे म्हणजे पर्यावरण विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत सुरू असतानाच ही घटना घडली. सायंकाळी सुरू असलेल्या बैठकीत हा प्रकार समोर आला.

पण स्लॅब कोसळल्याच्या घटनेमुळे आदित्य ठाकरे यांच्यासह इतर अधिकारी आणि मंत्री या दोघांनाही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. या संपुर्ण घटनेत कोणतीही जिवित हानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांच्या उपस्थित सध्या बैठका सुरू आहेत. त्यानिमित्तानेच आदित्य ठाकरे हे या आढावा बैठकांसाठी हजर होते. दरम्यान या घटनेनंतर मात्र आदित्य ठाकरे यांना त्याठिकाणाहून इतरत्र सुरक्षित स्थळी नेण्यात आले.

- Advertisement -

मुंबईत येत्या काळात तिसऱ्या लाटेच्या निमित्ताने सुरू असलेल्या तयारी बाबतचे ट्विट आदित्य ठाकरे यांनी दुपारीच केले होते. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविरोधीच्या लढाईत आदित्य ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीला मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त वेलासरू यांच्या उपस्थितीत आधीच एक बैठक पार पडली होती. त्यानंतर पर्यावरण विभागाची बैठक सुरू असताना ही घटना घडली. या बैठकीत आदित्य ठाकरे यांनी तिसऱ्या लाटेच्या निमित्ताने पीएस ऑक्सिजन युनिट, रिबॉटलिंग प्लॅंट, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, ऑक्सिजन स्टोरेज यासारख्या गोष्टींवर त्यांनी चर्चा केली. मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेदरम्यान ऑक्सिजनची कमतरता भासू नये या उदिष्टानेच त्यांनी ही बैठक घेतली होती.


 

- Advertisement -