घरमहाराष्ट्रनाशिककाळाराम मंदिरात वेदोक्त मंत्र म्हणण्यास विरोध; संभाजीराजेंची प्रतिक्रिया

काळाराम मंदिरात वेदोक्त मंत्र म्हणण्यास विरोध; संभाजीराजेंची प्रतिक्रिया

Subscribe

काळाराम मंदिरात वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांनी विरोध केल्याचा आरोप छत्रपती संभाजीराजेंच्या अर्धांगिणी संयोगिताराजे छत्रपती यांनी केलाय.

संभाजी राजे छत्रपती यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर आलेल्या संयोगिताराजे यांनी काळाराम मंदिरात दर्शन घेतलं होतं. यादरम्यान त्यांनी त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग सोशल मीडियावर पोस्ट केला होता. रामनवमीच्या निमित्ताने केलेल्या पोस्टवरून खळबळ उडाली होती. यावर आता संभाजी राजे छत्रपती यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.

काळाराम मंदिरात वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांनी विरोध केल्याचा आरोप छत्रपती संभाजीराजेंच्या अर्धांगिणी संयोगिताराजे छत्रपती यांनी केलाय. ‘छत्रपतींच्या घराण्याचा वारसा लाभलेला असल्याने महंतांच्या भूमिकेचा ठामपणे विरोध करू शकत आहे. ज्या मंदिरांमध्ये आज आपण नियम लावत आहात, ती मंदिरे वाचविण्याचे काम कुणी केले ?, असा सवालही त्यांनी केला आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाले. तसेच मोठ्या प्रमाणात काळाराम मंदिरातील महंतांना ट्रोल केले जात आहे. विशेष म्हणजे या मुद्यावरून भाविकांमध्येही मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. तसेच ईश्वराला भेटण्यासाठी आणि त्याच्या दर्शनासाठी तुमच्या मध्यस्थीची गरज नाही, असा थेट निशाणा त्यांनी महंतांवर साधलाय.

- Advertisement -

हे ही वाचा : राहुल गांधीनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे द्यायला मोदी का घाबरत आहेत? – नाना पटोले

संभाजीराजेंच्या अर्धांगिणी संयोगिताराजे छत्रपती यांनी शेअर केलेल्या पोस्टनंतर आता हे प्रकरण चांगलंच गाजतंय. यावर आता संभाजीराजें यांनी पत्रकार परिषद बोलावून आपली भावना व्यक्त केलीय. संभाजीराजे यांनी या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. संयोगीताराजेंनी दाखवलेल्या धाडसाचा मला अभिमान असून आजही मंदिरात अपप्रवृत्ती असल्याचे संभाजीराजे म्हणाले. पगारी पुजारी नेमायला पाहिजेत. जुन्या परंपरा कशा आहे त्याची चर्चा होऊन सगळं झालं पाहिजे. महंत कोल्हापुरात आले की त्याठिकाणी काय काय घडलं हे सर्वांसमोर मांडतो, असेही त्यांनी सांगितले.
“मंदिरातील अपप्रवृत्तीचा संयोगीताराजे यांना काळाराम मंदिरात त्याचा अनुभव आला. माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध मंदिरात त्यांनी दर्शन घेतलं. यावेळी त्यांना आलेला अनुभव परखडपणे मांडला त्याचा मला खूप अभिमान आहे. असे कृत्य करणारे लोक निर्माण होऊ नयेत, असे माझे मत आहे. वेदोक्त प्रकरणावर दीड महिन्यांनी बोलल्या म्हणजे त्या विचार करून बोलल्या आहेत. त्यावेळी माझा वाढदिवस होता म्हणून बोलल्या नाहीत.”, असंही यावेळी संभाजीराजे म्हणाले.

- Advertisement -

हे ही वाचा: छत्रपती संभाजी नगरमधील हिंसाप्रकरणी शरद पवार म्हणाले…

संयोगीताराजे कधी राजकीय व्यासपीठावर गेलेल्या नाहीत, पण त्यांनी जे स्पष्टपणे मांडलं त्याचा सार्थ अभिमान आहे. आजही मंदिरात अपप्रवृत्ती आहेत ते बदलणे गरजेचे आहे. अपप्रवृत्ती करणारे लोक आहेत त्यांनी स्वतःला विचारले पाहिजे. दरम्यान, महंतांनी मोठ्या महाराजांना भेटले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, जो महंत आहे त्यांचे पार्श्वभूमी काय आहे हे देखील तपासले पाहिजे. अकृत्य वेगवेगळ्या माध्यमातून करत असतात ते बंद झालं पाहिजे. माझी सगळ्यांना विनंती आहे की सामान्य माणसांच्या अधिकार आहे तो द्या. छत्रपती घराण्यातील स्त्रीला अवमानकारक बोललं गेलं, वागणूक दिली गेली. आजच्या घडीला देखील हे का घडतंय? हे सरकारने पहायला पाहिजे, असं देखील संभाजीराजे यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -