घरमहाराष्ट्र'भाड्याच्या मानसिकतेमुळे त्यांनी स्वत:ला राष्ट्रवादीकडे भाड्यानं लावलं', देशपांडेंचा राऊतांवर घणाघात

‘भाड्याच्या मानसिकतेमुळे त्यांनी स्वत:ला राष्ट्रवादीकडे भाड्यानं लावलं’, देशपांडेंचा राऊतांवर घणाघात

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विचार आणि भूमिका भाड्याने, प्रायोजित आहे, अशी टीका शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केली. या टीकेला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर देताना राऊतांवर घणाघात केला. संजय राऊत यांची मानसिकता भाड्याची आहे. त्यामुळे त्यांनी स्वत:ला राष्ट्रवादीकडे भाड्यानं लावलं आहे, अशा शब्दात देशपांडे यांनी राऊतांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

संदीप देशापांडे ट्विट करत राऊतांवर निशाणा साधला. “राष्ट्रवादीचे भाड्याचे प्रवक्ते श्री लवंडे साहेब यांची मानसिकता भाड्याची असल्यामुळे त्यांनी स्वत:ला राष्ट्रवादीकडे भाड्याने लावले असावे,” असं देशपांडे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

- Advertisement -

आर्थर रोडमध्ये जाऊन संशोधनच करा

संदीप देशपांडे यांनी संजय राऊत लवकरच आर्थर रोडमध्ये जातील असं सूचक वक्तव्य केलं. राज ठाकरेंचं हिंदुत्व नक्की कोणत्या प्रकारचं आहे, याचं संशोधन करावं त्यांनी. सध्या काम धंदे नाहीत त्यांना. आता आर्थर रोडला जातील, त्यानंतर एका रुममध्ये बसून संशोधनच करायचं आहे. त्यामुळे त्यांनी ते करत रहावं, असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -