घरताज्या घडामोडीज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमा किरण काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमा किरण काळाच्या पडद्याआड

Subscribe

अनेक मराठी चित्रपटात विविध भूमीका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमा किरण यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्या 61 वर्षांच्या होत्या.

अनेक मराठी चित्रपटात विविध भूमीका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमा किरण यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्या 61 वर्षांच्या होत्या. प्रेमा यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ८०,९० च्या दशकात प्रेमा किरण यांना अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका निभावल्या होत्या.

प्रेमा किरण यांनी धूमधडाका, दे दणादण, गडबड घोटाळा, अर्धांगी, सौभाग्यवती सरपंच, माहेरचा आहेर, अर्जुन देवा, उतावळा नवरा यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. 1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धूमधडाका’या चित्रपटात त्यांनी अंबाक्काची भूमिका साकारली होती. अभिनेत्रीसोबतच त्या निर्मात्यासुद्धा होत्या. 1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘उतावळा नवरा’ या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली होती.

- Advertisement -

2004 मध्ये त्या ‘गाव थोर पुढारी चोर’ या चित्रपटात झळकल्या होत्या. या चित्रपटात त्यांच्यासोबत दिगंबर नाईक आणि किशोर नांदलस्कर मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर ‘फ्रेंडशिप बँड’ आणि ‘एए बीबी केके’ या चित्रपटातदेखील त्यांनी भूमिका साकारली होती. फक्त मराठीच नाही तर गुजराती, भोजपुरी, अवधी, बंजारा या भाषेतील चित्रपटांमध्ये त्यांनी काम करत महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

प्रेमा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. नव्या कलाकारांना मालिकांचे पैसे तीन महिन्यांपर्यंत मिळत नाहीत. तसंच पडद्यामागील कलाकारांनाही कोणी वाली नाही. त्यांच्यासाठी राजकीय पक्षाच्या माध्यमातून काम करण्याचं ठरविल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यावेळी त्यांनी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचं सांगितलं होतं.

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -