घरमहाराष्ट्रनिवडणुकीत खर्च करण्यासाठी पैसा न दिल्याने भाजप नगरसेविकडून सुनेचा छळ

निवडणुकीत खर्च करण्यासाठी पैसा न दिल्याने भाजप नगरसेविकडून सुनेचा छळ

Subscribe

या भाजपाच्या नगरसेविकेसह इतर कुटुंबिय सदस्यांनी सुनेचा मानसिक आणि शारीरिक छळ केला.

निवडणुकीत खर्च करण्यासाठी पैस न दिल्यामुळे तसंच वारंवार बी.एम.डब्ल्यू ची मागणी करूनही दिली नसल्यामुळे भाजपच्या नगरसेविकेने सुनेचा छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना पिंपरी-चिंचवड मध्ये घडली आहे. भाजपच्या नगरसेविकेसह तिच्या दोन मुलांनी आणि भावाने सूनेचा मानसिक आणि शारीरीक छळ केल्याची घटना घडली आहे. या घटनेप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात २७ वर्षीय विवाहित महिलेने तक्रार केली आहे.

भाजपा नगरसेविका आरती सुरेश चौधे (सासू), संकेत सुरेश चौधे (पती), विनय सुरेश चौधे(दिर), किशोर निम्हण (सासूचा भाऊ) अशी आरोपींची नावे आहेत. दिर विनय सुरेश चौधे याने सुनेचा विनयभंग केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

- Advertisement -

नक्की काय घडले? 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१६ पासून २७ वर्षीय सुनेचा शारीरिक आणि मानसिक छळ होत आहे. माहेरहून बी.एम.डब्ल्यू घेऊन ये अशी मागणी करत निवडणुकीत खर्च करण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून सुनेचा वारंवार छळ केला जात होता. तसेच घरात राहण्याच्या लायकीची नाहीस असे म्हणून सुनेला वेळोवेळी अपमान करून केला जायचा. तर दिर सुनेचा घरामध्ये कोणी नसताना अंगाला स्पर्श करून विनयभंग करत असे. दरम्यान या सर्वाला विरोध केला असता शिवीगाळ केल्याच तक्रारीत म्हटलं आहे. आरोपी यांनी मानसिक आणि शारीरिक त्रास देऊन छळ केल्या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात संबंधित पीडित सुनेने तक्रार केली आहे. घटनेचा अधिक तपास सांगवी पोलीस करत आहेत.


हेही वाचा – उपमुख्यमंत्री पदाबाबत बाळासाहेब थोरात म्हणतात…

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -