घरमहाराष्ट्रउपमुख्यमंत्री पदाबाबत बाळासाहेब थोरात म्हणतात...

उपमुख्यमंत्री पदाबाबत बाळासाहेब थोरात म्हणतात…

Subscribe

शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या सरकारच्या खातेवाटपाचा निर्णय पुढील दोन दिवसांत होईल,असे महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.

राज्यातील सत्ता स्थापनेचा अखेर मंगळवारी तिढा सुटला. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्याने आता राज्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आपले बहुमत सिद्ध करत ‘महाविकास’आघाडीची सत्ता स्थापन करणार आहेत. तसेच ‘आज राज्यातील नवनिर्वाचित आमदारांनी देखील शपथ घेतली. या पार्श्वभूमीवर शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या सरकारच्या खातेवाटपाचा निर्णय पुढील दोन दिवसांत होईल,असे महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज सांगितले आहे.

- Advertisement -

काय म्हणाले थोरात

बाळासाहेब थोरात यांना उपमुख्यमंत्रीपद तुम्हाला दिले जाणार अशी चर्चा सुरु असल्याचे बोले असता त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, मला या शक्यतेबद्दल काही माहिती नसून या अटकळीवर मी काही भाष्य करु शकत नाही, असे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्रीपदाचा उद्या शपथविधी

राज्यातील सत्ता स्थापनेचा अखेर मंगळवारी तिढा सुटला. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्याने आता राज्यात शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आपले बहुमत सिद्ध करत ‘महाविकास’आघाडीची सत्ता स्थापन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज राज्यातील नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडत असून आघाडीच्या नेतेपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात येत असल्याचे पक्षांच्या ,संयुक्त बैठकीत जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे नवे मुख्यमंत्री होणार असून गुरुवारी संध्याकाळी ६.४० मिनिटांने उद्धव ठाकरे शिवाजीपार्क येथे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – योग्य वेळ आल्यावर दादांसोबत का आले ते सांगेन – देवेंद्र फडणवीस


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -