घरमहाराष्ट्रअजित पवारांना माहीत नसणं तांत्रिक बाब, अविश्वास प्रस्तावावरून संजय राऊतांची सारवासारव

अजित पवारांना माहीत नसणं तांत्रिक बाब, अविश्वास प्रस्तावावरून संजय राऊतांची सारवासारव

Subscribe

Maharashtra Winter Session 2022 | विरोधी पक्षातील नेते विधानसभेच्या अध्यक्षाविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर करतात मात्र, याबाबत विरोधी पक्षनेताच अनभिज्ञ असतो यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. मात्र, ही एक तांत्रिक बाब असल्याचं संजय राऊत म्हणाले.

Maharashtra Winter Session 2022 | नागपूर – विरोधी पक्षांना सभागृहात बोलू दिलं जात नाही या मुद्द्यावरून महाविकास आघाडीच्या आमदारांनी काल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Assembly Chairmen Rahul Narvekar) यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव (Motion of No Confidence) सादर केला. मात्र, याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांना माहितीच नव्हतं. अविश्वास प्रस्तावाबाबत अजित पवारांना माहित नसणं ही तांत्रिक बाब असल्याचं आज शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena Leader Sanjay Raut) म्हणाले. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना अजित पवारांच्या मुद्द्यावरून सारवासारव केली.

विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या आमदारांकडून काल अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आला. यावर ३९ आमदारांच्या सह्या होत्या. मात्र, विरोधी पक्षनेते अजित पवार यांची सही नव्हती. त्यामुळे याबाबत पत्रकारांनी अजित पवारांना विचारले. तेव्हा त्यांना या अविश्वास प्रस्तावाबाबात काहीच माहिती नसल्याचं स्पष्ट झालं. विरोधी पक्षातील नेते विधानसभेच्या अध्यक्षाविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर करतात मात्र, याबाबत विरोधी पक्षनेताच अनभिज्ञ असतो यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. मात्र, ही एक तांत्रिक बाब असल्याचं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – मविआच्या नेत्यांकडून अविश्वास प्रस्ताव, पण अजित पवार अनभिज्ञ; नेमकं प्रकरण काय?

संजय राऊत म्हणाले, तो तांत्रिक मुद्दा आहे. राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष आहेत. घटनात्मक पदावर बसून ते एकपक्षीय काम करतात. विरोधी पक्षांना ते बोलू देत नाही. पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखे काम करतात आणि बोलतात. विधानसभेच्या अध्यक्षांनी पक्षपाती वागू नये, त्या खूर्चीवर बसल्यावर वस्त्र आणि चप्पला ठेवल्या पाहिजेत. राहुल नार्वेकर यांच्याकडून तसं होत नाही. विरोधकांचा आवाज दाबायचा, शिवसेनेच्या आमदारांना बोलू द्यायचं नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय खाणाखुणा करतात त्यावर त्यांना बोलू देत नाहीत.

- Advertisement -

उद्धव ठाकरे विधिमंडळात होते. आमच्यासमोर काँग्रेस आणि शिवसेनेच्या अनेक आमदारांनी अविश्वास प्रस्तावावर सही केली. राष्ट्रवादीलाही या प्रस्तावाबाबत आमच्यासोबत यायचं आहे, असंही पुढे संजय राऊथ म्हणाले.

हेही वाचा – राहुल नार्वेकरांविरोधात महाविकास आघाडीकडून अविश्वास प्रस्ताव, विधानसभा सचिवांना दिले पत्र

हीराबेन मोदी यांना वाहिली श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक झाल्याने त्यांच्या दुःखात मी आणि संपूर्ण शिवसेना कुटुंबत सहभागी आहोत. हीराबेन यांचं आयुष्य संघर्षमय राहिलं. त्यांच्या संस्कारात नरेंद्र मोदी पंतप्रधानपदापर्यंत पोहोचले, असं संजय राऊत म्हणाले.

कर्नाटकच्या सीमेवरील बांधवांचं रक्षण करावं

कर्नाटकच्या सीमेवर अनेक मराठी बांधव राहतात. त्यांचं जीवन धोक्यात आहे. त्यामुळे कर्नाटकच्या सरकारने त्यांचं रक्षण केलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -